Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांचे रिटर्न्स महागाईच्या भरोसे

गुंतवणूकदारांचे रिटर्न्स महागाईच्या भरोसे

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कपात केल्याने बाजारात आनंदाचे वातावरण असले तरी या सप्ताहात जाहीर होणाऱ्या चलनवाढीच्या आकडेवारीवर बाजाराची नजर असणार आहे. या जोडीलाच मान्सूनची प्रगती, अमेरिकेतील बॉण्डसवर मिळणारा परतावा आणि व्यापारविषयक चर्चेनुसार बाजाराची चाल बदलण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:48 IST2025-06-09T10:42:59+5:302025-06-09T10:48:42+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कपात केल्याने बाजारात आनंदाचे वातावरण असले तरी या सप्ताहात जाहीर होणाऱ्या चलनवाढीच्या आकडेवारीवर बाजाराची नजर असणार आहे. या जोडीलाच मान्सूनची प्रगती, अमेरिकेतील बॉण्डसवर मिळणारा परतावा आणि व्यापारविषयक चर्चेनुसार बाजाराची चाल बदलण्याची शक्यता आहे.

Investor returns depend on inflation | गुंतवणूकदारांचे रिटर्न्स महागाईच्या भरोसे

गुंतवणूकदारांचे रिटर्न्स महागाईच्या भरोसे

- प्रसाद गो. जोशी
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कपात केल्याने बाजारात आनंदाचे वातावरण असले तरी या सप्ताहात जाहीर होणाऱ्या चलनवाढीच्या आकडेवारीवर बाजाराची नजर असणार आहे. या जोडीलाच मान्सूनची प्रगती, अमेरिकेतील बॉण्डसवर मिळणारा परतावा आणि व्यापारविषयक चर्चेनुसार बाजाराची चाल बदलण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणामध्ये व्याजदरात कपात केली असली तरी त्यांचे आगामी पाऊल काय राहणार आहे, याचा अंदाज बाजाराकडून बांधला जात आहे. त्यामुळेच या सप्ताहात जाहीर होणारी चलनवाढीची आकडेवारी काय संकेत देते, याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे.

अमेरिकेतील बॉण्डसवर चांगला परतावा येत असल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी उभरत्या बाजारांतील गुंतवणूक अमेरिकेकडे वळविणे सुरू केले आहे. त्यामुळे भारतीय बाजारात घसरण होणे अपेक्षित असले तरी देशांतर्गत वित्तसंस्थांच्या  पाठबळामुळे बाजारामध्ये वाढ झाली आहे. आगामी काळातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता 
वाटते.

परकीय वित्तसंस्था बनल्या पुन्हा विक्रेत्या
गेल्या महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या परकीय वित्तसंस्थांनी जून महिन्यामध्ये मात्र विक्री करण्याला प्रारंभ केलेला दिसून येत आहे. या महिन्याच्या सहा दिवसांच्या कालावधीत या संस्थांनी ८७४९ कोटी रुपये काढून घेतले आहेत. अमेरिका- चीन व्यापारामधील तणाव तसेच अमेरिकेतील बॉण्डसच्या गुंतवणुकीवरील परतावा वाढल्याने परकीय वित्तसंस्था पैसे काढण्यास प्राधान्य देत आहेत.

Web Title: Investor returns depend on inflation