Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूक ज्ञान: मुलीचे लग्न, शिक्षणासाठी पैसा हवा? कुठे मिळेल जास्त फायदा?

गुंतवणूक ज्ञान: मुलीचे लग्न, शिक्षणासाठी पैसा हवा? कुठे मिळेल जास्त फायदा?

Investment: तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. येथे पीपीएफ, सुकन्य समृद्धी योजना आणि एसआयपी या गुंतवणुकीच्या तीन पर्यायांची गणितासह तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:15 IST2025-08-26T09:14:36+5:302025-08-26T09:15:08+5:30

Investment: तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. येथे पीपीएफ, सुकन्य समृद्धी योजना आणि एसआयपी या गुंतवणुकीच्या तीन पर्यायांची गणितासह तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.

Investment Knowledge: Need money for daughter's marriage, education? Where can I get the most benefit? | गुंतवणूक ज्ञान: मुलीचे लग्न, शिक्षणासाठी पैसा हवा? कुठे मिळेल जास्त फायदा?

गुंतवणूक ज्ञान: मुलीचे लग्न, शिक्षणासाठी पैसा हवा? कुठे मिळेल जास्त फायदा?

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. येथे पीपीएफ, सुकन्य समृद्धी योजना आणि एसआयपी या गुंतवणुकीच्या तीन पर्यायांची गणितासह तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.
कमी जोखमीसाठी पीपीएफसह सुकन्या समृद्धी योजना हे चांगले पर्याय आहेत, पण जर तुम्ही थोडीशी जोखीम घेऊ शकत असाल, तर दीर्घकाळ एसआयपीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येतो. लक्षात घ्या, इथे १५ वर्षांसाठी गणिती तुलना केली आहे.

पीपीएफ : ७.१% वार्षिक व्याजाने, तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये असेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला सुमारे ३१.५५ लाख रुपये मिळतील, यात १३.५५ लाख रुपये व्याज असेल.
एसएसवाय : सुकन्या समृद्धी योजनेत ८.२% वार्षिक व्याजदराने, तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये होऊन तुम्हाला सुमारे ४७ लाख रुपये मिळतील, यात २९ लाख रुपये व्याज असेल.
एसआयपी : १२% वार्षिक परताव्याच्या अंदाजाने, १८ लाख रुपयांची गुंतवणूक १५ वर्षांत सुमारे ५०.४५ लाख रुपये होऊ शकते, यात ३२.४५ लाख रुपये नफा असेल. मात्र, यात जोखीम आहे.
 
Web Title: Investment Knowledge: Need money for daughter's marriage, education? Where can I get the most benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.