Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?

सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?

Gold Silver Return in 2025: २०२५ मध्ये सोन्याने आतापर्यंत ६६ टक्के इतका मोठा परतावा दिला आहे, तर चांदीने सर्व विक्रम मोडले असून ८५ टक्के वाढ नोंदवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:41 IST2025-12-02T15:59:48+5:302025-12-02T16:41:09+5:30

Gold Silver Return in 2025: २०२५ मध्ये सोन्याने आतापर्यंत ६६ टक्के इतका मोठा परतावा दिला आहे, तर चांदीने सर्व विक्रम मोडले असून ८५ टक्के वाढ नोंदवली आहे.

Investment Alert Is Silver the Best Commodity of 2025? Check Expert Forecasts | सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?

सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?

Gold Silver Return in 2025 : शेअर बाजारात मोठी अस्थिरता असतानाही, या वर्षामध्ये सोने आणि चांदीनेगुंतवणूकदारांची अक्षरशः झोळी भरली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी २०२५ मध्ये विक्रमी उच्चांक नोंदवला आहे. या वर्षात सोने सुमारे ६६% परतावा देऊन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले. पण, चांदीने तर सगळे विक्रम मोडीत काढले असून, तब्बल ८५% चा बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

तीन महिन्यांत चांदी ४०% महागली
मागील तीन महिन्यांचा विचार केल्यास, सोन्याच्या किमतीत जवळपास २५% वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत ४०% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या चांदीचा भाव सुमारे १.८० लाख रुपये प्रति किलो आहे.

या तेजीमागील प्रमुख कारणे

  1. US फेडरल रिझर्व्ह : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून बेंचमार्क व्याजदरात कपात होण्याची वाढती अपेक्षा.
  2. डॉलर : डॉलरचे सातत्याने कमजोर होणे.
  3. रुपया : भारतीय रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर जाणे.

चांदी २ लाख रुपयांचा टप्पा पार करणार?

या वर्षात चांदीच्या किमती दुप्पट झाल्यामुळे, गुंतवणूकदारांमध्ये आता एकच प्रश्न आहे की २०२५ च्या अखेरपर्यंत चांदी २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करेल का? एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापिका सुगंधा सचदेवा यांच्या मते, चांदीचा स्ट्रक्चरल मोमेंटम मजबूतपणे कायम आहे. चांदी सलग सातव्या महिन्यात तेजी दाखवत असून मार्च कॉन्ट्रॅक्टमध्ये तिने १,७५,४८४ रुपये प्रति किलोग्रामचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय स्पॉट चांदी ५४.४६ डॉलर प्रति औंसचा जुना रेझिस्टन्स तोडून ५६.५३ डॉलर प्रति औंस वर पोहोचली आहे.

चांदी महाग होण्याची मोठी कारणे

  • औद्योगिक मागणी: सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि फार्मा उद्योगांकडून चांदीची औद्योगिक मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
  • स्टॉकची कमतरता : जगभरातील गोदामे आणि बुलियन स्टॉक (विशेषतः चीन आणि लंडनमध्ये) या वर्षात वेगाने कमी होत आहे, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठा फरक पडत आहे. 
  • धोरणात्मक मूल्य : अमेरिकेने चांदीला आपल्या २०२५ च्या 'क्रिटिकल मिनरल्स' यादीत समाविष्ट केले आहे. यामुळे क्लीन एनर्जी तंत्रज्ञानामध्ये चांदीचे रणनीतिक मूल्य वाढले आहे.
  • पुरवठा ताण : याचा अर्थ आता प्रमुख अर्थव्यवस्था निर्यातीपूर्वी त्यांच्या देशांतर्गत गरजांना प्राधान्य देतील, ज्यामुळे जागतिक बाजारात चांदीचा पुरवठा आणखी कमी होऊ शकतो.

वाचा - भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!

या सर्व कारणांमुळे चांदीचा २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठणे कठीण वाटत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
 

Web Title : चांदी ने सोने को पछाड़ा, 85% रिटर्न; क्या जल्द ही ₹2 लाख/किलो?

Web Summary : चांदी की कीमतों में उछाल, इस साल 85% रिटर्न के साथ दोगुनी वृद्धि, सोने को पछाड़ा। विशेषज्ञों का अनुमान है कि यह 2025 तक ₹2 लाख/किलो तक पहुंच सकता है, औद्योगिक मांग, डॉलर की कमजोरी और सीमित स्टॉक से प्रेरित।

Web Title : Silver outperforms gold, yielding 85% returns; ₹2 lakh/kg soon?

Web Summary : Silver prices surge, doubling this year with 85% returns, surpassing gold. Experts predict it may reach ₹2 lakh/kg by 2025, fueled by industrial demand, dollar weakness and limited stock.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.