बँक एफडी (Fixed Deposit) हा गुंतवणुकीसाठी एक सर्वोत्तम आणि पारंपारिक पर्याय मानला जातो. बँक एफडीमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षितपणे नफा मिळवू शकता. देशातील वेगवेगळ्या बँका त्यांच्या एफडीवर वेगवेगळ्या व्याजदरानं परतावा देतात. तसंच, एफडीच्या कालावधीनुसारही व्याजदर वेगवेगळे असतात. जर तुम्हीही तुमच्या पैशांची गुंतवणूक बँक एफडीमध्ये करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेच्या एफडीबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही तुमच्या पैशांची गुंतवणूक करून २ लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता. आम्ही इंडसइंड बँक (IndusInd Bank) बद्दल बोलत आहोत. चला इंडसइंड बँकेच्या एफडीबद्दल माहिती घेऊया.
इंडसइंड बँक एफडीचे व्याजदर
इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या मुदतीच्या एफडी ऑफर करते. या एफडीवर वेगवेगळ्या व्याजदरानं परतावा दिला जातो.
या एफडीचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत:
कालावधी व्याजदर
१ वर्ष ६.७५ टक्के
२ वर्षे ६.९० टक्के
३ वर्षे ६.९० टक्के
५ वर्षे ६.६५ टक्के
इंडसइंड बँक एफडीमध्ये २ लाख रुपयांचा परतावा
जर तुम्ही इंडसइंड बँकेच्या ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीमध्ये ५ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ६.७५ लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्हाला जवळपास १.९५ लाख रुपयांचा नफा होईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.१५ टक्के आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मुदतपूर्तीवर एकूण ७.१२ लाख रुपये मिळतील. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना एकूण २.१२ लाख रुपयांचा लाभ होईल.
तुम्ही इंडसइंड बँकेच्या २ किंवा ३ वर्षांच्या मुदतीतही तुमच्या पैशांची गुंतवणूक करू शकता. या दोन्ही मुदतीचे व्याजदर ६.९० टक्के आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही २ वर्षांच्या एफडीमध्ये ५ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला ७३,३१३ रुपये लाभ होईल. तर, ३ वर्षांच्या मुदतीत १,१३,९०७ रुपये लाभ होईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)