Lokmat Money > बिझनेस न्यूज > विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ

विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ

विमा कंपन्या अनेक योजनांच्या पोटयोजना आणि त्यावर परत 'रायडर' म्हणून इतर छोट्या योजना जोडतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 06:08 IST2025-09-11T06:07:58+5:302025-09-11T06:08:56+5:30

विमा कंपन्या अनेक योजनांच्या पोटयोजना आणि त्यावर परत 'रायडर' म्हणून इतर छोट्या योजना जोडतात. 

Insurance premiums doubled in ten years! Companies loot customers; Increase premiums by showing fear | विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ

विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ

- पवन देशपांडे, मुंबई 
तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवायचे तर विमा काढा... अमूक-तमूक लाभ मिळतील, सुरक्षा कवच नसले तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती दाखवून विमा योजना माथी मारणाऱ्या कंपन्या विम्याच्या प्रिमियममध्ये भरमसाट वाढ करताना दिसत आहेत. दहा वर्षांत प्रीमियमसाठी भरावा लागणारा हप्ता दुप्पट झाला आहे. 

विमा कंपन्या अनेक योजनांच्या पोटयोजना आणि त्यावर परत 'रायडर' म्हणून इतर छोट्या योजना जोडतात. 

सुरुवातीला भरावा लागणाऱ्या प्रीमियममध्ये दरवर्षी १० ते १५ टक्के वाढ केली जाते. दहा वर्षांपूर्वी जो प्रीमियम १००० रुपये भरावा लागत होता तो आता १६०० ते २५०० रुपयांवर गेला आहे. 
दहा वर्षांपूर्वी आरोग्य विम्यापोटी भरावी लागणारी रक्कम १००० असेल तर ती आता २५०० ते ४००० रुपयांच्या घरात गेली आहे. 

४७ हजार कोटी रुपयांची कमाई

जीवन विमा कंपन्यांनी प्रीमियममधून २३-२४ मध्ये ४७,४०७ कोटींचा नफा कमविला आहे. 

२२-२३ च्या तुलनेत कंपन्यांच्या नफ्यात १०% वाढ झाली आहे. खासगी विमा कंपन्यांनी १२% नफा कमविला आहे.   

५१,५२४ कोटी रुपये कमिशन

विमा एजंटांचे कमिशनही प्रीमियममधून वसूल हाेते. २३-२४ या वर्षात असे ५१,५२४ कोटींचे कमिशन वाटले गेले. यात २१% वाढ झाली.

कसा वाढत गेला प्रीमियम ? प्रीमियम रक्कम (कोटींमध्ये)

२०१९-२०            १३,७३६
२०२०-२१            १५,१३५
२०२१-२२            २०,००१
२०२२-२३            २५,२५२
२०२३-२४            ३४,५०३

Web Title: Insurance premiums doubled in ten years! Companies loot customers; Increase premiums by showing fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.