Zomato Quick service: फूड एग्रीगेटर झोमॅटो आता १५ मिनिटांत तुमच्या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. झोमॅटोनं देशातील अनेक शहरांमध्ये क्विक फूड डिलिव्हरी सर्व्हिस - झोमॅटो क्विक (Zomato Quick) सुरू केली आहे. याद्वारे सुमारे १५ मिनिटांत युजर्सना घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवले जाणार आहे. कंपनी सध्या स्नॅक्स, डेजर्ट आणि पेयांसह फास्ट फूड आणि इन्स्टंट फूड सेवा देत आहे.
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या क्विक फीचरअंतर्गत आम्ही आता १५ मिनिटांत फूड डिलिव्हरी करत आहोत. याअंतर्गत लिस्टेड रेस्टॉरंट्सना मेन्यू आयटम आणि डिलिव्हरी फ्लीट देण्यात येत आहेत. इन्स्टंट फूड डिलिव्हरी सेवा सध्या निवडक ठिकाणी उपलब्ध असून येत्या काळात वाढकरण्यात येईल, असं बिझनेस स्टँडर्डनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना झोमॅटोच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
झोमॅटोने हे पाऊल अशा वेळी उचललंय जेव्हा ब्लिंकीट्सनं १० मिनिटांत डिलिव्हरीसाठी ब्लिंकिट्स बिस्ट्रो सेवा लाँच केली आहे. ब्लिंकिट्स बिस्ट्रो १० मिनिटांत ग्राहकांना ज्यूस, स्नॅक्स आणि फूड डिलिव्हरी करते. झोमॅटोकडे आधीपासूनच 'झोमॅटो एव्हरीडे' सेवा आहे जी ग्राहकांना झटपट खाद्यपदार्थ पुरवते. २०२३ मध्ये लाँच करण्यात आले होते. यापूर्वी कंपनीनं 'झोमॅटो इन्स्टंट' सेवा सुरू केली होती, परंतु १० मिनिटांत जेवण पोहोचवण्याचा सुरुवातीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि वर्षभरातच ती बंद करण्यात आली.
स्विगीचीही सेवाही
झोमॅटोप्रमाणेच स्विगीनंही ऑक्टोबर २०२४ मध्ये आपली १० मिनिटांची फूड डिलिव्हरी सर्व्हिस स्विगी बोल्ट लाँच केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकूण फूड डिलिव्हरी ऑर्डरपैकी ५ टक्के ऑर्डर या सेवेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. मात्र अनेक रेस्टॉरंट्स आणि नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांच्या या निर्णयावर टीका करत आहेत.