Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा ११ महिन्यांचा उच्चांक; सलग चौथ्या महिन्यात देशाला दरवाढीचा फटका; डाळी, बटाटे, खाद्यपदार्थ आणखी महागले

महागाईचा ११ महिन्यांचा उच्चांक; सलग चौथ्या महिन्यात देशाला दरवाढीचा फटका; डाळी, बटाटे, खाद्यपदार्थ आणखी महागले

जानेवारीत घाऊक महागाईचा दर १.८१ टक्के होता, तो २.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन, मूलभूत धातू व वस्त्रोद्योगातील किमती वाढल्याने हा परिणाम दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:33 IST2026-03-17T07:31:57+5:302026-03-17T07:33:52+5:30

जानेवारीत घाऊक महागाईचा दर १.८१ टक्के होता, तो २.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन, मूलभूत धातू व वस्त्रोद्योगातील किमती वाढल्याने हा परिणाम दिसून येत आहे.

Inflation hits 11-month high; Country hit by price hike for fourth consecutive month; Pulses, potatoes, food items become more expensive | महागाईचा ११ महिन्यांचा उच्चांक; सलग चौथ्या महिन्यात देशाला दरवाढीचा फटका; डाळी, बटाटे, खाद्यपदार्थ आणखी महागले

महागाईचा ११ महिन्यांचा उच्चांक; सलग चौथ्या महिन्यात देशाला दरवाढीचा फटका; डाळी, बटाटे, खाद्यपदार्थ आणखी महागले

नवी दिल्ली : घाऊक महागाईने फेब्रुवारीमध्ये ११ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. अन्नपदार्थ आणि उत्पादन क्षेत्रातील किमतीत वाढ झाल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर २.१३ टक्क्यांवर पोहोचला, अशी माहिती सोमवारी सरकारी आकडेवारीतून समोर आली. विशेष म्हणजे, अमेरिका-इराण तणावामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम मार्च महिन्याच्या आकडेवारीवर अधिक तीव्रतेने दिसून येण्याची शक्यता आहे.

जानेवारीत घाऊक महागाईचा दर १.८१ टक्के होता, तो २.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन, मूलभूत धातू व वस्त्रोद्योगातील किमती वाढल्याने हा परिणाम दिसून येत आहे.

भाज्या मात्र स्वस्तच
फेब्रुवारीमध्ये अन्नपदार्थांतील महागाई २.१९ टक्क्यांवर पोहोचली. जानेवारीमध्ये ती १.५५ टक्के होती. भाज्यांच्या किमतीत काहीशी नरमाई दिसली असली तरी डाळी, बटाटे यांच्या किमती वाढल्याने अन्नमहागाई वाढली.

कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ (डॉलर प्रती बॅरल)
जानेवारी २०२६     ६३
फेब्रुवारी २०२६     ६८
मार्च २०२६     १०१

बेरोजगारीत घट 
देशातील बेरोजगारी दर फेब्रुवारी महिन्यात किंचित कमी झाला असून, तो ४.९ टक्क्यांवर आला आहे. जानेवारीमध्ये हा दर ५ टक्के होता. १५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील लोकांमधील बेरोजगारीत घट झाली आहे. 

मार्चमध्ये ‘भडका’ 
कच्च्या तेलाचे भाव मार्चमध्ये १०० डॉलरच्या पार गेले आहेत. ‘इंडिया रेटिंग्स’च्या मते, कच्च्या तेलाच्या या दरवाढीचा थेट परिणाम मार्चच्या घाऊक महागाईवर होईल. हा दर मार्चमध्ये ३.७ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
 
Web Title : थोक मुद्रास्फीति 11 महीने के उच्च स्तर पर; दालें, आलू के दाम बढ़े।

Web Summary : फरवरी में भारत की थोक मुद्रास्फीति बढ़कर 2.13% हो गई, जो 11 महीनों में सबसे अधिक है, जिसका कारण खाद्य और विनिर्माण की कीमतों में वृद्धि है। दालें और आलू महंगे हो गए। कच्चे तेल की कीमतों में वृद्धि से मार्च में मुद्रास्फीति और बढ़ने की उम्मीद है, जो संभावित रूप से 3.7% तक पहुंच सकती है।

Web Title : Wholesale inflation hits 11-month high; prices of pulses, potatoes rise.

Web Summary : India's wholesale inflation surged to an 11-month high of 2.13% in February, driven by rising food and manufacturing prices. Pulses and potatoes became more expensive. Crude oil price hikes are expected to further fuel inflation in March, potentially reaching 3.7%.