Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्या गुंतवणूकीसाठी खुला होणार या वर्षाचा अखेरचा IPO; ₹८० प्रीमिअमवर पोहोचला GMP, नफ्याचे संकेत

उद्या गुंतवणूकीसाठी खुला होणार या वर्षाचा अखेरचा IPO; ₹८० प्रीमिअमवर पोहोचला GMP, नफ्याचे संकेत

Indo Farm Equipment IPO: आर्थिक विकासाचा वेग, अनुकूल बाजारपेठेची परिस्थिती आणि नियामक चौकटीतील सुधारणा यामुळे यंदा म्हणजेच २०२४ मध्ये आयपीओ बाजारात लक्षणीय तेजी दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:43 IST2024-12-30T15:43:32+5:302024-12-30T15:43:32+5:30

Indo Farm Equipment IPO: आर्थिक विकासाचा वेग, अनुकूल बाजारपेठेची परिस्थिती आणि नियामक चौकटीतील सुधारणा यामुळे यंदा म्हणजेच २०२४ मध्ये आयपीओ बाजारात लक्षणीय तेजी दिसून आली आहे.

Indo Farm Equipment IPO last ipo of this year will open for investment tomorrow GMP reaches rs 80 premium hints of profit | उद्या गुंतवणूकीसाठी खुला होणार या वर्षाचा अखेरचा IPO; ₹८० प्रीमिअमवर पोहोचला GMP, नफ्याचे संकेत

उद्या गुंतवणूकीसाठी खुला होणार या वर्षाचा अखेरचा IPO; ₹८० प्रीमिअमवर पोहोचला GMP, नफ्याचे संकेत

Indo Farm Equipment IPO: यंदा २०२४ मध्ये एकापाठोपाठ एक कंपनीचे मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले. आर्थिक विकासाचा वेग, अनुकूल बाजारपेठेची परिस्थिती आणि नियामक चौकटीतील सुधारणा यामुळे यंदा म्हणजेच २०२४ मध्ये आयपीओ बाजारात लक्षणीय तेजी दिसून आली आहे. वर्षभरात कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून विक्रमी १.६ लाख कोटी रुपये उभे केले. त्यापैकी बहुतेकांनी उत्तम परतावा दिला. 

एकट्या डिसेंबर महिन्यात किमान २० आयपीओ उघडले आहेत. आता उद्या ३१ डिसेंबरला आणखी एक आयपीओ उघडणार आहे. हा या वर्षातील शेवटचा मेन बोर्ड आयपीओ आहे. आम्ही इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओबद्दल बोलत आहोत. गुंतवणूकदार ३१ जानेवारी ते २ जानेवारी या कालावधीत या इश्यूमध्ये गुंतवणूक करू शकतात. २०४ ते २१५ रुपये प्रति शेअर असा याचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

अधिक माहिती

२६० कोटी रुपयांचा हा इश्यू २ जानेवारीला बंद होत असून अँकर गुंतवणूकदार ३० डिसेंबरला शेअर्ससाठी बोली लावू शकतील. या आयपीओमध्ये ८६ लाख इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आणि ३५ लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे. या इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनी क्षमता वाढविण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कंपनीची एनबीएफसी उपकंपनी बरोटा फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी करणार आहे.

जीएमपी किती?

Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच जीएमपी ८० रुपये आहे. म्हणजेच लिस्टिंगवर कंपनीचे शेअर्स ३७ टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावू शकतात. याची अपेक्षित लिस्टिंग प्राईज २९५ रुपये आहे. हे शेअर्स ७ जानेवारीला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Indo Farm Equipment IPO last ipo of this year will open for investment tomorrow GMP reaches rs 80 premium hints of profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.