Indigo Airlines: तुम्ही 2026 मध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. IndiGo एअरलाईन्सने ‘सेल इंटू 2026’ या विशेष सेलअंतर्गत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर अत्यंत किफायतशीर दरात तिकीट उपलब्ध करून देणार आहे. या सेलमध्ये केवळ तिकीटच नव्हे, तर प्रवासाशी संबंधित अनेक अतिरिक्त सेवांवरही मोठ्या सवलती देण्यात येत आहेत
₹1,499 पासून देशांतर्गत हवाई प्रवास
इंडिगोच्या या सेलमध्ये देशांतर्गत उड्डाणांसाठी तिकीट ₹1,499 पासून आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तिकीट ₹4,499 पासून उपलब्ध आहे. याशिवाय, इंडिगोच्या प्रीमियम सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या IndiGoStretch श्रेणीत निवडक देशांतर्गत मार्गांवर भाडे ₹9,999 पासून सुरू असतील. ही ऑफर 2026 मधील सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या, तसेच सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
बुकिंग आणि प्रवासाचा कालावधी
ही सवलत आजपासून 16 जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंगसाठी खुली राहणार आहे. या ऑफरअंतर्गत प्रवासाची तारीख 20 जानेवारी ते 30 एप्रिल 2026 असेल. ऑफर इंडिगोच्या सर्व बुकिंग चॅनेल्सवर उपलब्ध आहे.
अतिरिक्त सेवांवर मोठ्या सवलती
तिकीट दरांव्यतिरिक्त, इंडिगोने अनेक अतिरिक्त सेवांवर सवलती जाहीर केल्या आहेत. निवडक 6E Add-ons सेवांवर 70% पर्यंत सूट, प्री-पेड एक्स्ट्रा बॅगेजवर 50% सवलत, स्टँडर्ड सीट सिलेक्शनवर 15% सूट आणि निवडक देशांतर्गत मार्गांवर Emergency XL (जास्त लेगरूम) सीट्स ₹500 पासून सुरू आहे.
लहान मुलांसाठी विशेष ऑफर
कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी इंडिगोने खास ऑफर जाहीर केली आहे. 0 ते 24 महिन्यांपर्यंतच्या शिशूंना देशांतर्गत उड्डाणात केवळ ₹1 भाडे आकारले जाणार आहे. यासाठी तिकीट इंडिगोच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरूनच बुक करणे आवश्यक आहे.
