Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर!

अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर!

हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:10 IST2019-07-31T16:09:16+5:302019-07-31T16:10:03+5:30

हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.

IndiGo offers flight tickets from ₹999 in new flash sale | अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर!

अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर!

नवी दिल्ली : हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. इंडिगोविमान कंपनीने आपल्या 13 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. या सेलच्या माध्यमातून इंडिगोने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवासासाठी सवलत आणली आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी कमीतकमी 999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3499 रुपये इतका तिकीट दर कंपनीकडून करण्यात आला आहे.  

इंडिगो कंपनीच्या 999 आणि 3499 रुपयांच्या ऑफरसाठी आजपासून बुकिंग सुरु असून 4 ऑगस्ट 2019 पर्यंत करता येणार आहे. कंपनीकडून या ऑफरची माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे की, 15 ऑगस्ट 2019  ते 28 मार्च 2020 च्या दरम्यान प्रवाशांसाठी मर्यादित असणार आहे.  

याचबरोबर, कंपनीकडून या वार्षिक सेल ऑफरसाठी किती सीट्स असणार आहेत, हे सुद्धा सांगण्यात आले आहे. ही ऑफर प्रस्थान (departure) च्या तारखेपासून कमीत कमी 15 दिवस आधी आणि ऑफर काळात बुकिंग केल्यानंतर स्वीकारली जाईल. तसेच, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यासाठी बुकिंगच्यावेळी बँक ऑफ बडोदाच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास कॅशबॅकची ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुकिंग करताना येस बँकचे क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक मिळणार आहे. 
 

Web Title: IndiGo offers flight tickets from ₹999 in new flash sale