lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > IndiGo ची जबरदस्त ऑफर, फ्लाइट तिकिटांवर मिळेल २००० रुपयांपर्यंत सवलत

IndiGo ची जबरदस्त ऑफर, फ्लाइट तिकिटांवर मिळेल २००० रुपयांपर्यंत सवलत

कंपनीची ही ऑफर आजपासून सुरू झाली असून ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 05:07 PM2023-08-02T17:07:35+5:302023-08-02T17:08:06+5:30

कंपनीची ही ऑफर आजपासून सुरू झाली असून ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू असणार आहे.

indigo launched 17th anniversary sale offer discount up to rs 2000 on flight tickets | IndiGo ची जबरदस्त ऑफर, फ्लाइट तिकिटांवर मिळेल २००० रुपयांपर्यंत सवलत

IndiGo ची जबरदस्त ऑफर, फ्लाइट तिकिटांवर मिळेल २००० रुपयांपर्यंत सवलत

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. कंपनी लोकांना फ्लाइट तिकिट बुकिंगवर २००० रुपयांपर्यंत सवलत देत आहे. हा सेल तीन दिवस असणार आहे. इंडिगोच्या ऑपरेशन्सला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने 'अ‍ॅनिव्हर्सरी सेल' सुरू केला आहे. 

कंपनीची ही ऑफर आजपासून सुरू झाली असून ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू असणार आहे. अशा परिस्थितीत, जे या कालावधीत विमान तिकीट बुक करतात, त्यांना वाजवी किंमतीवर २००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. ही सवलत सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या ऑफरला 'HappyIndiGoDay' असे नाव दिले आहे.

१२ टक्क्यांपर्यंत होईल पैशांची बचत 
इंडिगो एअरलाइन्स आपल्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे बुक केलेल्या सर्व तिकिटांवर १२ टक्के सूट देत आहे. ही सवलत ३ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल, तर ४ ऑगस्टला तिकीट बुकवर केवळ ७ टक्के सूट मिळेल. सवलतीची मर्यादा २००० रुपयांपर्यंत आहे.

क्रेडिट कार्डवर अतिरिक्त पैसे वाचवा
या ऑफरसाठी इंडिगोने अमेरिकन एक्सप्रेस आणि एचएसबीसीच्या क्रेडिट कार्डसोबत करार केला आहे. यावर लोकांना अतिरिक्त फायदा मिळेल आणि २ ऑगस्टला म्हणजेच आजच्या दिवशी तिकीट बुक केल्यावर त्यांना ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. अमेरिकन एक्सप्रेसच्या ग्राहकांसाठी ५००० रुपयांच्या किमान ऑर्डर व्हॅल्यूवर २००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक असणार आहे. याचबरोबर, एचएसबीसी क्रेडिट कार्डवर ३५०० रुपयांच्या ऑर्डर व्हॅल्यूवर ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. या कार्डवरील ऑफर ४ ऑगस्टपर्यंत वैध आहे आणि कमाल सूट मर्यादा २००० रुपये आहे.

आवडती सीट १७ रुपयांत
इतकेच नाही तर या ऑफर अंतर्गत इंडिगो लोकांना आपली आवडती सीट निवडण्याचे स्वातंत्र्य देत आहे. यासाठी तीन दिवसांच्या सेल दरम्यान १७ रुपयांपासून पेमेंट सुरू आहे.

Web Title: indigo launched 17th anniversary sale offer discount up to rs 2000 on flight tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.