२०२० मध्ये "स्कॅम १९९२" ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. हर्षद मेहताची भूमिका प्रतीक गांधी यानं साकारली होती. एके काळी शेअर बाजारात हर्षद मेहताचा बोलबाला होता. या वेब सिरीजमध्ये प्रतीक गांधी याचा एक डायलॉग आहे, "रिस्क है तो इश्क है," चर्चा करत असताना तो आपल्या भावाला हे म्हणतो. आता भारतीयांसोबतही असंच काहीसं घडत आहे. कारण त्यांच्या गुंतवणूक पद्धती बदलल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, ते आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करतात.
गेल्या दहा वर्षांत भारतीय कुटुंबांच्या बचतीच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. बँक एफडीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांची जागा आता म्युच्युअल फंड व शेअर बाजारावर आधारित गुंतवणुकीनं घेतली आहे. घरगुती बचतीमध्ये इक्विटी-म्युच्युअल फंडांचा वाटा २०१२ मध्ये २% पेक्षा कमी होता, जो आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १५% पेक्षा जास्त झाला आहे, जो जवळजवळ सात पट वाढला आहे. याउलट, याच कालावधीत बँक मुदत ठेवींचा वाटा ५८% वरून सुमारे ३५% पर्यंत घसरला आहे.
| वर्ष खर्च | योग्य उत्पन्न | निव्वळ उत्पन्न |
| २०२३-२४ | २,१९,३१२ | १,८८,८९२ |
| २०२४-२५ | २,३८,२७० | २,०५,३२४ |
| २०२५-२६ | २,५४,८४९ | २,१९,५७५ |
८४ लाख कोटींची गुंतवणूक भारतीयांनी शेअर बाजार व म्युच्युअल फंडांत केली.
| २०१२ | २०२५ | |
| बँक डिपॉझिट | ५७.९% | ३५.२% |
| म्युच्युअल फंड | १.८% | १५.२% |
