Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर

आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर

Share Market Today: अमेरिका आणि भारतामधील तणाव कमी झाल्याच्या बातमीने बाजार उत्साहित झाला. दिवसअखेर ऑटो आणि मीडिया शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बाजारातील काही वाढ मर्यादित राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:01 IST2025-09-10T17:01:21+5:302025-09-10T17:01:21+5:30

Share Market Today: अमेरिका आणि भारतामधील तणाव कमी झाल्याच्या बातमीने बाजार उत्साहित झाला. दिवसअखेर ऑटो आणि मीडिया शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बाजारातील काही वाढ मर्यादित राहिली.

Indian Stock Market Rally Continues; Investors Gain ₹2.64 Lakh Crore | आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर

आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर

Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज १० सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दमदार कामगिरी दाखवली. निफ्टी सलग सहाव्या दिवशी तर सेन्सेक्स चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला. अमेरिका आणि भारतामधील तणाव कमी झाल्याच्या बातमीने बाजारात उत्साह दिसून आला. मात्र, निफ्टी २५,००० चा महत्त्वपूर्ण टप्पा पार करू शकला नाही. दिवसाच्या शेवटी ऑटो आणि मीडिया शेअर्समधील नफावसुलीने बाजारातील वाढ काही प्रमाणात मर्यादित केली.

बाजाराची आजची आकडेवारी

  • सेन्सेक्स: ३२३ अंकांच्या (०.४०%) वाढीसह ८१,४२५.१५ वर बंद.
  • निफ्टी: १०४.५ अंकांच्या (०.४२%) वाढीसह २४,९७३.१० वर बंद.
  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही आज जोरदार तेजी दिसून आली आणि दोन्ही निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज निफ्टी आयटी इंडेक्समध्ये सर्वाधिक २.६% ची तेजी दिसून आली. पीएसयू बँक इंडेक्स २.२% मजबूत झाला, तर रियल्टी इंडेक्समध्येही १% ची वाढ झाली. दुसरीकडे, ऑटो इंडेक्समध्ये १% ची घट झाली, तर मीडिया शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला.

गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये
आज १० सप्टेंबर रोजी बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून ४५६.४९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील दिवशी ४५३.८४ लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये आज सुमारे २.६४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.६४ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढलेले आणि घसरलेले शेअर्स
आज सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.२६% ची तेजी राहिली. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, बजाज फायनान्स, टीसीएस आणि टेक महिंद्राचे शेअर्स १.८८% ते २.५७% च्या वाढीसह बंद झाले.

याउलट, सेन्सेक्समधील ११ शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर २.४७% घसरणीसह टॉप लूझर्स ठरला. तसेच, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि इटरनलच्या शेअर्समध्ये ०.४३% ते १.५३% पर्यंत घट झाली.

वाचा - भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

आजची एकूण बाजाराची स्थिती
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर आज वाढीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक होती. एक्सचेंजवर एकूण ४,२८२ शेअर्समध्ये व्यवहार झाला. यापैकी २,४०९ शेअर्स तेजीसह, तर १,७१७ शेअर्स घसरणीसह बंद झाले. १५६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आज ११८ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर ५३ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक गाठला.

Web Title: Indian Stock Market Rally Continues; Investors Gain ₹2.64 Lakh Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.