Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का

अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का

Stock Market News: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:20 IST2025-08-26T10:19:26+5:302025-08-26T10:20:01+5:30

Stock Market News: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

Indian Stock Market Crashes as US Imposes 50% Tariff | अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का

अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का

Stock Market Today : अमेरिकेतर्फे भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू होण्यापूर्वीच, देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिकेदरम्यानची व्यापारी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर २७ ऑगस्टपासून हे नवीन टॅरिफ दर प्रभावी होणार आहेत. यामुळे आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगला. सुरुवातीच्या सत्रातच, बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळून लाल निशाणीवर आला. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० देखील २४,८०० च्या पातळीखाली घसरला.

घसरणीचे कारण आणि परिणाम
ब्रोकरेज फर्मच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफचा सर्वाधिक परिणाम कापड, इंजिनिअरिंग गुड्स, लेदर आणि केमिकल्स कंपन्यांवर होऊ शकतो, कारण या कंपन्यांचा अमेरिकेच्या बाजारपेठेत मोठा वाटा आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर लवकरच पर्यायी बाजारपेठांचा शोध घेतला नाही किंवा देशांतर्गत उपभोग वाढवण्यासाठी ठोस पाऊले उचलली नाहीत, तर येणाऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या कमाईवर आणि बाजाराच्या स्थितीवर याचा अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो.

शेअर बाजारातील शेअर्सची स्थिती
मंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ५ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाणीत उघडले, तर उर्वरित २१ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणीत उघडले. ४ कंपन्यांचे शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय उघडले. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० मधील १४ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीत, तर ३५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणीत उघडले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टायटनचे शेअर्स सर्वाधिक ०.४९ टक्के वाढीसह उघडले, तर सनफार्माचे शेअर्स सर्वाधिक ०.९७ टक्के घसरणीसह उघडले.

हिरव्या निशाणीत उघडलेले सेन्सेक्सचे शेअर्स
हिंदुस्तान युनिलिव्हर (०.३७%), बजाज फायनान्स (०.१२%), ट्रेंट (०.०८%) आणि एसबीआय (०.०४%) हे शेअर्स वाढीसह उघडले. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बीईएलचे शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय उघडले.

वाचा - ५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!

आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण
आज इटरनल (०.८६%), आयसीआयसीआय बँक (०.८३%), एनटीपीसी (०.८३%), भारती एअरटेल (०.८०%), अॅक्सिस बँक (०.७४%), टेक महिंद्रा (०.७०%), इन्फोसिस (०.६८%), कोटक महिंद्रा बँक (०.६३%) आणि बजाज फिनसर्व्ह (०.५२%) सारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह उघडले. याशिवाय, अदाणी पोर्ट्स, पॉवरग्रिड, टीसीएस, एल अँड टी, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक आणि आयटीसीच्या शेअर्समध्येही नुकसान झाले.
 

Web Title: Indian Stock Market Crashes as US Imposes 50% Tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.