Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात?

९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात?

Indian Currency : मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम भारतीय रुपयावर होत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत प्रथमच रुपया ९३.२८ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:14 IST2026-03-20T12:13:24+5:302026-03-20T12:14:07+5:30

Indian Currency : मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम भारतीय रुपयावर होत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत प्रथमच रुपया ९३.२८ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

Indian Rupee Hits Record Low of 93.28 Against USD Amid Middle East Tensions | ९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात?

९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात?

Dollar vs Rupee : मध्य आशियातील वाढता युद्धजन्य तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अनपेक्षित वाढ, याचा मोठा फटका भारतीय चलनाला बसला आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल ६४ पैशांनी कोसळून ९३.२८ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन ठरले असून, यंदाच्या वर्षात आतापर्यंत रुपयात ३.६४ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

युद्धाचा विळखा आणि तेलाचा भडका
गुरुवारी इस्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' या महत्त्वाच्या गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १०.९ टक्क्यांची प्रचंड वाढ होऊन 'ब्रेंट क्रूड' ११९.१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. इराणने आखाती देशांना दिलेल्या धमकीमुळे ऊर्जा प्रकल्पांना धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी सुधारणा होऊन त्या १०७.२ डॉलरवर आल्या आहेत. मात्र, तरीही रुपयावरील दबाव कमी झालेला नाही.


अर्थव्यवस्थेवर दुहेरी संकट

  • 'फिनरेक्स ट्रेजरी ॲडव्हायझर्स'चे कार्यकारी संचालक अनिल कुमार भंसाली यांच्या मते, भारतीय रुपयाची स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. त्यांनी व्यक्त केलेली प्रमुख भीती खालीलप्रमाणे.
  • तुटीत वाढ : जोपर्यंत कच्चे तेल ८० डॉलरच्या खाली येत नाही, तोपर्यंत परकीय चलनाचा ओघ थांबणे कठीण आहे. याचा थेट परिणाम भारताच्या चालू खात्यातील तूट आणि वित्तीय तुटीवर होईल.
  • विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत असल्यामुळे रुपयावर ताण येत आहे.
  • आता सर्वांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाकडे लागल्या आहेत. जोपर्यंत आरबीआय ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत रुपया सावरणे कठीण दिसते.

वाचा - घसरणीनंतर मौल्यवान धातूंमध्ये तेजीचे पुनरागमन! चांदी ८,५०० रुपयांनी वधारली तर सोन्यातही मोठी

निर्यातदार आणि बाजारपेठेची मानसिकता
सध्याच्या अस्थिरतेमुळे निर्यातदार डॉलर विकण्याऐवजी ते राखून ठेवण्यावर भर देत आहेत. तेल कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने आणि निर्यातदारांनी हात आखडता घेतल्याने बाजारात डॉलरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या पश्चिम आशियात सैन्य तैनात करण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, ऊर्जा क्षेत्रातील अनिश्चितता अद्याप कायम आहे.

Web Title : रुपया 93 के पार, तेल की कीमतों से आरबीआई चिंतित, अर्थव्यवस्था खतरे में?

Web Summary : मध्य पूर्व के तनाव और कच्चे तेल की बढ़ती कीमतों के कारण रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर आ गया। बढ़ते घाटे और विदेशी निवेशकों की निकासी से चिंता बढ़ रही है। वैश्विक अनिश्चितता और निर्यातकों की हिचकिचाहट के बीच मुद्रा को स्थिर करने के लिए सबकी निगाहें अब आरबीआई के हस्तक्षेप पर हैं।

Web Title : Rupee crashes past 93, RBI concerned over oil price surge.

Web Summary : The rupee plummeted to a record low due to Middle East tensions and rising crude oil prices. Concerns rise over widening deficits and foreign investor pullout. All eyes are now on RBI intervention to stabilize the currency amidst global uncertainty and exporter hesitancy.