Train Ticket Booking Options : भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. यातील बहुतांश लोक रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. कारण, आरक्षित डब्यातून प्रवास करणे सोपे असून त्यात प्रवाशांनाही अनेक सुविधा मिळतात. तसेच, तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन प्रकारे बुक करू शकता. ऑनलाइन बुकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर ऑफलाइनसाठी तुम्हाला रेल्वे काउंटरवर जावे लागते.
ऑनलाइनबद्दल बोलायचे झाले तर, यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या (IRCTC) Rail Connect ॲप आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर जाऊन तुमचे तिकीट बुक करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीवर अकाउंट तयार करावे लागेल. दरम्यान, आपण आयआरसीटीसी साइट आणि ॲपबद्दल बोललो, असलो तरी गेल्या काही दिवसांमध्ये आयआरसीटीसी साइट डाउन झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आयआरसीटीसी व्यतिरिक्त तुम्ही इतर अॅपद्वारे देखील रेल्वेचे तिकीट बुक करू शकता.
ConfirmTkt
रेल्वे तत्काळ तिकीट बुक करताना लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तातडीच्या एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर आयआरसीटीसी साइटवरून बुकिंग शक्य नाही. त्यामुळे तुम्ही ConfirmTkt ॲप वापरू शकता. या ॲपद्वारे तुम्ही कन्फर्म तिकीट सहज बुक करू शकता. तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असल्यास, तुम्ही या ॲपद्वारे त्याची प्रोबेबिलिटी देखील तपासू शकता. या ॲपद्वारे तुम्ही तत्काळ तिकिटेही सहज बुक करू शकता.
Paytm
सामान्यतः लोक पेमेंट करण्यासाठी पेटीएम (Paytm) ॲप वापरतात. पण तुम्ही पेटीएमद्वारे ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. पेटीएम ॲपद्वारे तुम्हाला अनेक ऑफर्स मिळतात. तुम्ही पेटीएमवर कन्फर्मेशेन प्रोबेबिलिटी देखील पाहू शकता. तुम्हाला येथे पेमेंटचे अनेक पर्याय देखील मिळतात.
Ixigo
तुम्ही Ixigo द्वारे सहज तिकिटे देखील बुक करू शकता. यामध्ये तुम्ही सर्व ट्रेन्सची माहिती आणि तिकीट कन्फर्मेशन अंदाज पाहू शकता. त्यामुळे याशिवाय तुम्ही ट्रेन बुक करू शकता तसेच ट्रेन ट्रेक करू शकता.
MakeMyTrip
हे भारतातील प्रसिद्ध ट्रॅव्हल बुकिंग ॲप आहे. याचा वापर करून तुम्ही ट्रेनचे तिकीट अगदी सहज बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. येथे तुम्हाला ट्रिप गॅरंटीचे फीचर देखील मिळेल. यामध्ये जर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर कंपनी तुम्हाला तिकिटाच्या रकमेसोबत एक कूपन देते.