Indian Post : भारतीय टपाल विभाग उद्या, म्हणजेच 17 मार्च 2026 पासून ‘24 स्पीड पोस्ट’ ही नवी जलद कुरिअर सेवा सुरू करणार आहे. या सेवेअंतर्गत पाठवलेले पार्सल पुढील दिवशी (Next Day Delivery) पोहोचवण्याची हमी असेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि दूरसंचार राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते दिल्लीतील आकाशवाणी भवनात या सेवेचे उद्घाटन होणार आहे.
पहिल्या टप्प्यात निवडक शहरांमध्ये सेवा
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सेवेची सुरुवात पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये करण्यात येणार आहे. या सेवेमध्ये 24 आणि 48 स्पीड पोस्ट, असे दोन पर्याय उपलब्ध असतील. त्याअंतर्गत D+1 डिलिव्हरी 24 तासांत पार्सल पोहोचवण्याची सेवा असेल, तर D+2 डिलिव्हरी 48 तासांत पार्सल पोहोचवण्याची सेवा असेल. यासाठी समर्पित प्रोसेसिंग विंडो आणि प्राधान्याने हवाई वाहतूक व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे.
This isn’t about counting days.
— India Post (@IndiaPostOffice) March 16, 2026
Waiting for a new chapter in delivery, starting 17 March.
#BigReveal#SomethingBig#IndiaPost#DeliveryServices#DakSewaJanSewa#ComingSoon#Countdown#StayTunedpic.twitter.com/bINwebTihV
ग्राहकांसाठी विशेष सुविधा
या नव्या सेवेअंतर्गत अनेक आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. यात OTP आधारित सुरक्षित डिलिव्हरी, SMS अलर्टसह एंड-टू-एंड ट्रॅकिंग, कमर्शियल ग्राहकांसाठी BNPL (Buy Now Pay Later) सुविधा, बल्क बुकिंगसाठी मोफत पिकअप सेवा, API इंटीग्रेशन, केंद्रीकृत बिलिंग प्रणालीसारख्या सुविधा मिळतील.
‘मनी-बॅक गॅरंटी’
या सेवेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डिलिव्हरी उशिरा झाल्यास मनी-बॅक गॅरंटी दिली जाणार आहे. जर कुरिअर ठरलेल्या वेळेत पोहोचले नाही, तर ग्राहकाने भरलेले सेवा शुल्क परत दिले जाईल.
नागरिकांना जलद कुरिअर सेवा
भारतीय टपाल विभागाच्या या नव्या उपक्रमामुळे देशातील नागरिकांना एक ते दोन दिवसांत कुरिअर मिळण्याची खात्रीशीर आणि जलद सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे इंडिया पोस्टची प्रीमियम एक्सप्रेस डिलिव्हरी क्षमता आणखी मजबूत होणार असल्याचे संचार मंत्रालयाने म्हटले आहे.
