Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाकसोबतचा व्यापार भारतीय थांबविणार, २६ राज्यांतील व्यापारी नेत्यांचा मोठा निर्णय

पाकसोबतचा व्यापार भारतीय थांबविणार, २६ राज्यांतील व्यापारी नेत्यांचा मोठा निर्णय

बैठकीत पहलगाम हल्ल्याचा बैठकीत तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबविण्याचा ठराव संमत केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:30 IST2025-04-29T16:30:36+5:302025-04-29T16:30:55+5:30

बैठकीत पहलगाम हल्ल्याचा बैठकीत तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबविण्याचा ठराव संमत केला.

India will stop trade with Pakistan big decision of business leaders from 26 states | पाकसोबतचा व्यापार भारतीय थांबविणार, २६ राज्यांतील व्यापारी नेत्यांचा मोठा निर्णय

पाकसोबतचा व्यापार भारतीय थांबविणार, २६ राज्यांतील व्यापारी नेत्यांचा मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार तात्काळ थांबविण्याचा निर्णय भारतातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट) एकमुखाने घेतला आहे. संस्थेच्या संचालन परिषदेची बैठक २६ राज्यांतील २०० व्यापारी नेत्यांच्या उपस्थितीत भुवनेश्वर येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेतला. ‘कैट’चे सरचिटणीस आणि चांदणी चौकचे संसद सदस्य प्रवीण खंडेलवाल यांनी  पहलगाम हल्ल्याचा बैठकीत तीव्र शब्दांत निषेध केल्याचं सांगितलं. तसंच पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबविण्याचा ठराव संमत केल्याचं म्हटलं.

आयात-निर्यात रोखणार 

कैटने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय आहे की, पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पाकसोबतची सर्व प्रकारची आयात-निर्यात रोखण्याचा निर्णय व्यावसायिक समुदायाने घेतला. हा हल्ला घडविणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाईसाठी व्यापारी समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबाही जाहीर केला आहे. 

ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान

२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. २०१८ मध्ये ३ अब्ज डॉलरवर असलेला दोन्ही देशांतील व्यापार २०२४ मध्ये १.२ अब्ज डॉलरवर इतकाच राहिला होता. आता तो पूर्णच थांबेल.

 

Web Title: India will stop trade with Pakistan big decision of business leaders from 26 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.