Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा

आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा

Nashik Wine : अल्कोहोलिक पेयांच्या निर्यातीत भारत जगात ४० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात टॉप १० निर्यातदारांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:32 IST2025-07-25T10:14:02+5:302025-07-25T10:32:41+5:30

Nashik Wine : अल्कोहोलिक पेयांच्या निर्यातीत भारत जगात ४० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात टॉप १० निर्यातदारांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

India-UK FTA to Boost Exports of Traditional Beverages Like Feni, Toddy & Nashik Wine | आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा

आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा

Nashik Wine : गोव्याची प्रसिद्ध फेनी, नाशिकमधील हस्तनिर्मित वाईन आणि केरळमधील ताडी यांसारख्या भारतातील पारंपारिक, हाताने बनवलेल्या पेयांना आता युनायटेड किंगडममध्येही अधिकृत मान्यता मिळणार आहे! गुरुवारी भारत आणि यूके यांच्यात मुक्त व्यापार करार झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांसोबत देशालाही होणार आहे.

GI टॅगसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश
या करारामुळे, भारतीय पारंपारिक पेयांना केवळ भौगोलिक संकेत संरक्षणसोबत यूकेसारख्या विकसित बाजारपेठेतही प्रवेश मिळेल. यूकेमध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांची मागणी वेगाने वाढत आहे, त्यामुळे या भारतीय पेयांना तिथे चांगली संधी मिळेल. याचा अर्थ, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लोकांना आता भारतीय पेयांची वेगळी आणि खास चव चाखायला मिळेल.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या एफटीएमुळे स्कॉच व्हिस्की आणि इतर आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबतच पारंपारिक भारतीय हस्तनिर्मित पेये यूकेच्या स्टोअर्समध्ये आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससारख्या विशिष्ट बाजारपेठांमध्येही दिसू लागतील. गोव्याची फेनी, नाशिकची वाईन आणि केरळमधील ताडी यांना आता जीआय संरक्षणासह यूकेच्या उच्च दर्जाच्या किरकोळ आणि हॉस्पिटॅलिटी साखळ्यांमध्ये स्थान मिळेल.

२०३० पर्यंत निर्यातीत मोठी वाढ अपेक्षित
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय अल्कोहोलिक पेयांची निर्यात वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांसाठी हा करार एक मोठी उपलब्धी आहे. जरी हे क्षेत्र अजूनही नवीन असले तरी, सरकारला २०३० पर्यंत भारतातील अल्कोहोलिक पेयांची निर्यात सध्याच्या ३७०.५ दशलक्ष डॉलरवरून १ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

या वर्षी एप्रिलमध्ये, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने म्हटले होते की, भारतीय अल्कोहोलिक पेयांना जागतिक बाजारपेठेत मोठी क्षमता आहे. देशात जिन, बिअर, वाईन आणि रम यांसारखी अनेक दर्जेदार उत्पादने उपलब्ध आहेत, जी परदेशात विकली जाऊ शकतात.

वाचा - कंपनीला नुकसान, पण अध्यक्षांना 'बंपर' पगारवाढ! टाटा सन्सच्या N. चंद्रशेखरन यांचं पॅकेज पाहून डोळे विस्फारतील!

सध्या, अल्कोहोलिक पेयांच्या निर्यातीत भारत जगात ४० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात टॉप १० निर्यातदारांमध्ये स्थान मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात, भारताची अल्कोहोलिक पेयांची निर्यात २,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. युएई, सिंगापूर, नेदरलँड्स, टांझानिया, अंगोला, केनिया आणि रवांडा ही भारताची प्रमुख बाजारपेठ होती. या करारामुळे यूके ही देखील एक महत्त्वाची बाजारपेठ बनेल.
 

 

Web Title: India-UK FTA to Boost Exports of Traditional Beverages Like Feni, Toddy & Nashik Wine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.