lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश

बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश

भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) मानकानुसार तयार केल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या बुलेट प्रूफ जाकीट्सची शंभर देशांत निर्यात केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:45 AM2019-10-05T05:45:39+5:302019-10-05T05:46:04+5:30

भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) मानकानुसार तयार केल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या बुलेट प्रूफ जाकीट्सची शंभर देशांत निर्यात केली जात आहे.

 India is the fourth country to manufacture bullet proof jackets | बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश

बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश

- एस. के. गुप्ता  
नवी दिल्ली : भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) मानकानुसार तयार केल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या बुलेट प्रूफ जाकीट्सची शंभर देशांत निर्यात केली जात आहे. मोदी सरकारने लष्कर आणि निमलष्कर दलातील जवानांच्या सुरक्षेसाठी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात उचलले हे मोठे पाऊल आहे. बीआयएसने यासाठी निश्चित केलेल्या मानकाची विदेशात प्रशंसा होत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीनंतर बुलेट प्रूफ जाकीटसाठी मानक निश्चित करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे, असे केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व नागरीपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
बुलेट प्रूफ जाकीटसाठी मानक दर्जा निश्चित करण्यासाठी बीआयएसने डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तज्ज्ञांचे सहकार्य घेतले. याच मानकानुसार जाकीट्सच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या जात आहेत.

Web Title:  India is the fourth country to manufacture bullet proof jackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.