Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI ची ऐतिहासिक कामगिरी, जानेवारी महिन्यात तब्बल 1,700 कोटी व्यवहार...

UPI ची ऐतिहासिक कामगिरी, जानेवारी महिन्यात तब्बल 1,700 कोटी व्यवहार...

UPI Transactions: जानेवारीमध्ये 1,700 कोटी व्यवहारांद्वारे 23.48 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 21:24 IST2025-02-28T21:24:38+5:302025-02-28T21:24:38+5:30

UPI Transactions: जानेवारीमध्ये 1,700 कोटी व्यवहारांद्वारे 23.48 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली.

India again set a new record in UPI transactions, 1,700 crore transactions were done in January alone | UPI ची ऐतिहासिक कामगिरी, जानेवारी महिन्यात तब्बल 1,700 कोटी व्यवहार...

UPI ची ऐतिहासिक कामगिरी, जानेवारी महिन्यात तब्बल 1,700 कोटी व्यवहार...


UPI Transactions: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात UPI चे जाळे वेगाने पसरत आहे. फक्त भारतच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्येही UPI व्यवहार सुरू झाले आहेत. दरम्यान, UPI व्यवहारांने बाबतीत भारत नवीन उंची गाठत आहे. जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच UPI व्यवहारांनी 16.99 अब्जाचा आकडा ओलांडला. या व्यवहारांद्वारे 23.48 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली. आतापर्यंत एका महिन्यात UPI व्यवहारांची ही सर्वात मोठी संख्या आहे.

80 टक्के रिटेल पेमेंट UPI द्वारे 
UPI ने भारतातील डिजिटल व्यवहार पूर्णपणे बदलले आहेत. देशभरातील 80 टक्के किरकोळ पेमेंट याद्वारे केले जातात. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण व्यवहाराचे प्रमाण 131 अब्ज रुपयांपेक्षा जास्त होते, ज्याचे मूल्य 200 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, बँका आणि फिनटेक प्लॅटफॉर्मच्या वाढत्या नेटवर्कमुळे जानेवारीपर्यंत, 80 पेक्षा जास्त UPI ॲप्स आणि 641 बँका सध्या UPI इकोसिस्टमवर लाइव्ह आहेत.

व्यवहाराचे प्रमाण 
मंत्रालयाने पुढे म्हटले की, 2024-25 या आर्थिक वर्षात (जानेवारीपर्यंत), P2M (व्यक्ती ते व्यापारी) व्यवहारांचे योगदान 62.35 टक्के आहे तर P2P (व्यक्ती ते व्यक्ती) व्यवहारांचे योगदान एकूण UPI व्हॉल्यूमच्या 37.65 टक्के आहे. जानेवारी 2025 मध्ये P2M व्यवहारांचे योगदान 62.35 टक्क्यांपर्यंत पोहोचले, ज्यात 86 टक्के व्यवहार 500 रुपयांपर्यंतचे होते. मंत्रालयाने म्हटले आहे की, यावरुन लोकांचा UPI वर किरकोळ रक्कम भरण्यावर किती विश्वास आहे हे दिसून येते.

UPI या देशांमध्ये देखील सक्रिय 
सध्या यूएई, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, मॉरिशस या देशांमध्ये यूपीआयद्वारे व्यवहार केले जात आहेत. यामुळे भारतीयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पेमेंट करण्याची सुविधा मिळते.
 

 

Web Title: India again set a new record in UPI transactions, 1,700 crore transactions were done in January alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.