Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?

Income Tax Return : १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या तारखेपासून अनेक आर्थिक नियमात बदल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:04 IST2026-04-03T16:04:47+5:302026-04-03T16:04:47+5:30

Income Tax Return : १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या तारखेपासून अनेक आर्थिक नियमात बदल झाले आहेत.

Income Tax Return Forms for AY 2026-27 Notified: Major Changes in ITR-1 for Homeowners | इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?

Income Tax Return : नवे आर्थिक वर्ष सुरू होताच प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी प्राप्तिकर विभागाने ITR-1 ते ITR-7 पर्यंतचे सर्व फॉर्म्स अधिसूचित केले आहेत. यामुळे करदात्यांना या महिन्यापासूनच रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

दोन घरांचे उत्पन्न दाखवता येणार
यावर्षीच्या आयटीआर फॉर्म्समध्ये सर्वात मोठा बदल ITR-1 मध्ये करण्यात आला आहे. आता ज्या करदात्यांना दोन घरांतून उत्पन्न मिळते, ते देखील ITR-1 फॉर्म वापरू शकतील. याआधी एकापेक्षा जास्त घर असलेल्या करदात्यांना ITR-2 किंवा ITR-3 फॉर्म भरावा लागत असे, जो अधिक क्लिष्ट होता. व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असल्यास, लॉटरी किंवा शर्यतीतून उत्पन्न असल्यास किंवा १.२५ लाखांपेक्षा जास्त भांडवली नफा असल्यास करदात्यांना ITR-1 वापरता येणार नाही.

पगारदार वर्गाला 'फॉर्म १६' ची प्रतीक्षा करावी लागणार
नोकरी करणाऱ्या करदात्यांसाठी रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया थोडी उशिरा सुरू होईल. पगारदार लोकांसाठी रिटर्न भरण्यासाठी 'फॉर्म १६' अनिवार्य असतो. कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी १५ जूनपर्यंत फॉर्म १६ देणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचाऱ्याचा पगार आणि कापलेल्या टीडीएसचा पूर्ण तपशील असतो.

जुन्या की नव्या कायद्यानुसार टॅक्स भरणार?

  • १ एप्रिल २०२६ पासून देशात 'प्राप्तिकर कायदा २०२५' लागू झाला असला तरी, रिटर्न भरताना गोंधळून जाऊ नका.
  • कायदा १९६१ प्रभावी: आर्थिक वर्ष २०२५-२६ चे रिटर्न हे प्राप्तिकर कायदा १९६१ नुसारच फाईल केले जातील.
  • महत्त्वाची तारीख: वैयक्तिक करदात्यांसाठी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही असेल.
  • यूटिलिटी लवकरच सुरू: प्राप्तिकर विभाग प्रथम फॉर्म्स जाहीर करतो आणि त्यानंतर फाईलिंगसाठी लागणारी 'यूटिलिटी' (सॉफ्टवेअर) सक्रिय करतो. यंदा ही प्रक्रिया एप्रिलमध्येच सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

वाचा - १ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम

आर्थिक नियोजनाचा नवा मंत्र
रिटर्न फाईल करण्यासोबतच करतज्ज्ञांनी 'वन-वीक रूल' वापरण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी एक आठवडा विचार केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो आणि आर्थिक शिस्त लागते, ज्यामुळे भविष्यात पैशांची चणचण भासत नाही.
 

Web Title : आयकर रिटर्न दाखिल जल्द शुरू; ITR-1 में बड़े बदलाव!

Web Summary : आयकर विभाग ने ITR फॉर्म अधिसूचित किए, जिससे जल्दी फाइलिंग संभव है। ITR-1 अब दो घरों से आय वाले करदाताओं को अनुमति देता है। वेतनभोगियों को फॉर्म 16 का इंतजार है। रिटर्न 1961 अधिनियम के तहत हैं, 31 जुलाई, 2026 तक फाइल करें। समझदारी से वित्त योजना बनाएं।

Web Title : Income Tax Return Filing Starts Soon; Big Changes in ITR-1!

Web Summary : Income Tax Department notifies ITR forms, enabling early filing. ITR-1 now allows taxpayers with two house incomes. Form 16 is awaited by salaried individuals. Returns are under the 1961 Act, file by July 31st, 2026. Plan finances wisely.