Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > २५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ

२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ

Richest Indian in UAE: दुबई आणि संपूर्ण यूएईमध्ये शेकडो भारतीय व्यावसायिक स्थायिक झाले आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं येथे नाव कमावलं आहे आणि मोठी संपत्ती जमा केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:34 IST2025-10-28T12:24:11+5:302025-10-28T12:34:35+5:30

Richest Indian in UAE: दुबई आणि संपूर्ण यूएईमध्ये शेकडो भारतीय व्यावसायिक स्थायिक झाले आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं येथे नाव कमावलं आहे आणि मोठी संपत्ती जमा केली आहे

Immense wealth in 25 countries lulu mall m a Yusuff Ali richest Indians in UAE net worth more than 50 thousand crores | २५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ

२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ

Richest Indian in UAE: दुबई आणि संपूर्ण यूएईमध्ये शेकडो भारतीय व्यावसायिक स्थायिक झाले आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं येथे नाव कमावलं आहे आणि मोठी संपत्ती जमा केली आहे. यामध्ये रिजवान साजन, बीआर शेट्टी, पीएनसी मेनन आणि आझाद मुपेन यांसारखी मोठी नावं आहेत. पण या सगळ्यांमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहेत? ते आहेत एमए युसूफ अली.

फोर्ब्सनुसार, त्यांची सध्याची संपत्ती सुमारे ५०,८५५ कोटी रुपये आहे. ते जगातील ६६३ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना मिडल ईस्टचे रिटेल किंग असंही म्हटलं जातं. चला, त्यांची गोष्ट थोडी जवळून जाणून घेऊया, जी केरळच्या एका छोट्याशा गावातून सुरू होऊन जागतिक साम्राज्यापर्यंत पोहोचली.

महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

डिस्ट्रीब्यूशन व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली

एमए युसूफ अली यांचा जन्म केरळमधील एका सामान्य कुटुंबात झाला. १९७३ मध्ये त्यांनी आपल्या काकांच्या छोट्या डिस्ट्रीब्यूशन व्यवसायाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अबू धाबी गाठलं. तेथून त्यांनी रिटेलचा प्रवास सुरू केला. १९९० च्या दशकात आखाती युद्ध शिगेला असताना त्यांनी आपले पहिलं लुलु हायपरमार्केट उघडलं. त्यावेळी रिटेल बाजारात बदल होत होता, छोट्या दुकानांची जागा हायपरमार्केट घेत होते. युसूफ अली यांनी संधी ओळखली आणि हळूहळू आपलं साम्राज्य वाढवलं.

आज ते लुलु ग्रुप इंटरनॅशनलचे चेअरमन आहेत. या ग्रुपचा महसूल ७.३ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ६४,०७७ कोटी रुपये इतका आहे. ते २५ देशांमध्ये २४० हून अधिक हायपरमार्केट आणि मॉल्स चालवतात, ज्यात आखाती देशांव्यतिरिक्त भारत, आशिया आणि युरोपमधील स्टोअर्सचा समावेश आहे.

युरोपमध्येही मालमत्ता

भारतातही लुलु मॉलची चांगली उपस्थिती आहे, विशेषतः दक्षिण भारतात, जसं की केरळमध्ये अनेक मोठे मॉल्स आहेत. युसूफ अली कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील भागीदार आहेत आणि त्याच्या बोर्डवर कार्यरत आहेत. हे विमानतळ सौर ऊर्जेवर चालतात, जे पर्यावरणाच्या दृष्टीनं एक चांगलं पाऊल आहे. २०२४ मध्ये त्यांनी आपला रिटेल व्यवसाय अबू धाबी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केला. यातून त्यांना १.७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १४,००० कोटी रुपये मिळाले. या निर्णयानं त्यांचं साम्राज्य अधिक मजबूत केलं.

युरोपमध्येही त्यांची मालमत्ता आहे, ज्यात स्कॉटलंडमधील वॉल्डोर्फ एस्टोरिया हॉटेल आणि लंडनमध्ये ग्रेट स्कॉटलंड यार्ड हॉटेल यांचा समावेश आहे. हे शेवटचे हॉटेल एकेकाळी यूकेच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांचे मुख्यालय होतं. अशा आलिशान मालमत्ता त्यांच्या संपत्तीची उदाहरणं आहेत.

यादीत युसूफ अलींचा क्रमांक कितवा?

युसूफ अली केवळ व्यवसायासाठीच नव्हे, तर समाजसेवेसाठीही प्रसिद्ध आहेत. कोविड-१९ महासाथीच्या काळात त्यांनी ६.८ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ५० कोटी रुपये दान केले. केरळमध्ये १,४०० बेडचे उपचार केंद्र बांधून सरकारला सुपूर्द केले. गुजरात भूकंप, आशियातील त्सुनामी आणि पूर यांसारख्या आपत्तींमध्येही त्यांनी मदत केली. २०१८ मध्ये केरळमधील पुरासाठी ९.५ कोटी रुपये दिले. परदेशातील भारतीयांच्या कल्याणासाठीही ते सक्रिय आहेत. आखाती देशांमध्ये चर्च आणि स्मशानभूमी बांधण्यास त्यांनी मदत केली.

भारताच्या श्रीमंतांच्या यादीत युसूफ अली ४९ व्या स्थानावर आहेत. २०२४ मध्ये त्यांची निव्वळ संपत्ती ६६,६३८ कोटी रुपये होती, जी आता थोडी कमी होऊन ५०,८५५ कोटी झाली आहे. तरीही, ते यूएईमधील सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत.

Web Title: Immense wealth in 25 countries lulu mall m a Yusuff Ali richest Indians in UAE net worth more than 50 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.