Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरी विकतंय हे IITian कपल; एका प्लेटची किंमत आहे ५००० रुपये

कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरी विकतंय हे IITian कपल; एका प्लेटची किंमत आहे ५००० रुपये

Success Story: आयआयटी (IIT) मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं स्वप्न पाहतात. मात्र, अंकिता खांटे यांची स्वप्नं काही वेगळीच होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:55 IST2026-02-05T11:53:22+5:302026-02-05T11:55:32+5:30

Success Story: आयआयटी (IIT) मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं स्वप्न पाहतात. मात्र, अंकिता खांटे यांची स्वप्नं काही वेगळीच होती

IITian couple quit their corporate jobs and are selling panipuri in London one plate costs Rs 5000 | कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरी विकतंय हे IITian कपल; एका प्लेटची किंमत आहे ५००० रुपये

कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरी विकतंय हे IITian कपल; एका प्लेटची किंमत आहे ५००० रुपये

Success Story: आयआयटी (IIT) मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं स्वप्न पाहतात. मात्र, अंकिता खांटे यांची स्वप्नं काही वेगळीच होती. त्यांनी आपले पती अमन कृष्णा यांच्यासह गलेलठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि घराच्या स्वयंपाकघरातून पाणीपुरी विकायला सुरुवात केली. आज त्या लंडनमध्ये एका प्रसिद्ध 'सपर क्लब'च्या मालकीण आहेत.

सॅमसंगमधील डिझायनर ते लंडनमधील क्लबच्या मालक

आयआयटी गुवाहाटीची माजी विद्यार्थिनी आणि सॅमसंगमधील माजी डिझायनर अंकिता खांटे लंडनमध्ये एक छोटा 'सपर क्लब' (जेथे लोक एकत्र बसून जेवतात) चालवतात. हा क्लब अनोळखी व्यक्तींमध्ये खाद्यपदार्थांच्या माध्यमातून मैत्रीचा पूल बांधण्याचे काम करतो. अंकिता यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, पाणीपुरी विकून त्या आता चांगली कमाई करत आहेत.

सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा भूकंप; एका झटक्यात २७,८८४ रुपयांनी स्वस्त झालं Silver, काय आहेत नवे दर?

नागपूरमध्ये लहानाची मोठी झालेल्या अंकिता यांनी नागपूरच्या VNIT मधून आर्किटेक्चरमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर आयआयटी गुवाहाटीमधून डिझाइनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. २०२४ मध्ये लग्नानंतर त्या युकेमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे पती अमन हे मूळचे उत्तर प्रदेशातील ओब्रा येथील असून त्यांनी आयआयटी धनबाद आणि आयआयआयटी हैदराबादमधून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलंय. हॉटेल व्यवसायाचा कोणताही अनुभव नसतानाही, या दाम्पत्यानं भारतीय आदरातिथ्याच्या जोरावर काहीतरी खास करण्याचं ठरवलं.


नोकरीतून ब्रेक आणि 'द बाऊझी क्लब'ची सुरुवात

लंडनला गेल्यानंतर अंकिता यांनी काही काळ नोकरीतून ब्रेक घेतला होता. त्यापूर्वी त्यांनी बंगळुरूमधील सॅमसंग रिसर्चमध्ये प्रॉडक्ट डिझायनर म्हणून तीन वर्ष काम केलं होतं. मित्रांना घरी बोलावून जेवू घालण्याची त्यांची आवड एका मोठ्या व्यवसायात बदलली. यातूनच 'The Bouzi Club' चा जन्म झाला. हा एक मासिक, तिकीट असलेला सपर क्लब असून तो हे दाम्पत्य आपल्या घरीच आयोजित करते.

५००० रुपये प्रति व्यक्ती शुल्क

या क्लबमध्ये दरवेळी १० ते १२ पाहुण्यांना आमंत्रित केलं जातं. त्यांना सात कोर्सचा एक खास मेन्यू दिला जातो, ज्यामध्ये भारतीय चवीला एका नवीन रूपात सादर केलं जातं. या एका जेवणाची किंमत ५० पाऊंड म्हणजेच सुमारे ५,००० रुपये प्रति व्यक्ती आहे. जेवणासोबतच चर्चांवरही येथे भर दिला जातो. लंडनमध्ये ज्यांचं सामाजिक वर्तुळ नाही, अशा लोकांसाठी एक ग्रुप निर्माण करणं हा यामागचा मूळ उद्देश आहे.

प्रादेशिक चवींना पसंती

अंकिता यांच्या क्लबमध्ये 'ढोली कढी' आणि 'नागपूर स्टाईल सांभर वडी' या पदार्थांना मोठी पसंती मिळते. हे असे प्रादेशिक पदार्थ आहेत जे सहसा रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये दिसत नाहीत. पाहुण्यांना या घरगुती आणि मूळ संस्कृतीशी जोडलेल्या चवी प्रचंड आवडत आहेत.

सुरुवातीला या व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, जसं त्यांनी पाणीपुरी देण्यास सुरुवात केली, तसं सर्व काही बदललं. पाणीपुरीमुळे लोकांमध्ये संवाद वाढला आणि प्रत्येक पाहुण्याने आपल्या शाळेच्या किंवा कुटुंबाच्या आठवणी शेअर करायला सुरुवात केली. अंकिता यांच्या मते, पाणीपुरी संपूर्ण भारतात आवडीनं खाल्ली जाते आणि प्रत्येकाकडे त्याबद्दल काही ना काही कथा असते. याच आठवणींनी त्यांच्या व्यवसायाला वेग मिळवून दिला.

Web Title : IITian दंपत्ति ने छोड़ी नौकरी, लंदन में बेच रहे हैं पानीपुरी

Web Summary : आईआईटी स्नातक अनिकिता और अमन ने लंदन में 'द बाऊजी क्लब' शुरू करने के लिए ऊँची तनख्वाह वाली नौकरियाँ छोड़ दीं। लोकप्रिय पानीपुरी सहित क्षेत्रीय भारतीय व्यंजन परोसते हुए, उनका सपर क्लब प्रति व्यक्ति £50 (₹5000) चार्ज करता है, जो एक अनूठा पाक अनुभव और समुदाय को बढ़ावा देता है।

Web Title : IITian Couple Ditch Corporate Jobs, Sell Pani Puri in London

Web Summary : IIT graduates Anikta and Aman left high-paying jobs to start 'The Bouzi Club' in London. Serving regional Indian cuisine, including the popular Pani Puri, their supper club charges £50 (₹5000) per person, offering a unique culinary experience and fostering community.