Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैसे पाहून तोंड उघडंच राहिल! NPS मध्ये महिन्याला ₹५००० गुंतवले तर Retirement वर किती पेन्शन मिळणार?

पैसे पाहून तोंड उघडंच राहिल! NPS मध्ये महिन्याला ₹५००० गुंतवले तर Retirement वर किती पेन्शन मिळणार?

निवृत्तीसाठी नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. आज आपण निवृत्तिसाठीची सर्वोत्तम योजना एनपीएस बद्दल जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:41 IST2025-07-11T14:40:03+5:302025-07-11T14:41:22+5:30

निवृत्तीसाठी नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. आज आपण निवृत्तिसाठीची सर्वोत्तम योजना एनपीएस बद्दल जाणून घेऊ.

If you invest rs 5000 per month in NPS how much pension will you get on retirement | पैसे पाहून तोंड उघडंच राहिल! NPS मध्ये महिन्याला ₹५००० गुंतवले तर Retirement वर किती पेन्शन मिळणार?

पैसे पाहून तोंड उघडंच राहिल! NPS मध्ये महिन्याला ₹५००० गुंतवले तर Retirement वर किती पेन्शन मिळणार?

निवृत्तीसाठी नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. आज आपण निवृत्तिसाठीची सर्वोत्तम योजना एनपीएस बद्दल जाणून घेऊ. आज आपण समजून घेऊ की जर तुम्ही दरमहा थोडे पैसे जमा केले तर निवृत्तीनंतरही तुमचं नियमित उत्पन्न कसं राहील.

समजा तुम्ही ३० वर्षांचे आहात आणि तुम्ही तुमच्या एनपीएस खात्यात दरमहा ५००० रुपये जमा करता. अशा प्रकारे तुमची वार्षिक गुंतवणूक ६० हजार रुपये होईल. पुढील ३० वर्षांत तुम्ही एकूण १८ लाख रुपये जमा कराल. निवृत्तीच्या वेळी, तुमचा एकूण निधी सुमारे १,१३,९६,६२७ रुपये असेल, ज्यापैकी ९५,९६,६२७ रुपये फक्त व्याजातून मिळालेले असतील.

एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

ही चक्रवाढीची शक्ती आहे, ज्यामुळे पैसे वाढतच राहतात. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही दरमहा ५००० रुपये गुंतवत असाल तर निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल? ही गणना तुम्हाला हे समजून घेण्यास मदत करेल.

रिटायरमेंटवर दोन पर्याय

जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतील. एकतर तुम्ही तुमचे सर्व पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन मिळण्यास सुरुवात करा किंवा तुम्ही ६०% रक्कम काढा आणि उर्वरित ४०% रक्कम अॅन्युइटी प्लॅन करा. निवृत्तीनंतर एनपीएसच्या किमान ४० टक्के रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवावी लागते. आम्ही असं गृहीत धरत आहोत की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी १०% परतावा मिळाला आहे.

४०% रकमेवर किती पेन्शन मिळेल

जर तुम्ही तुमच्या एकूण १,१३,९६,६२७ रुपयांच्या ४०% म्हणजेच ४५,५८,६५० रुपये अॅन्युईटीमध्ये गुंतवले तर तुमचं पेन्शन कमी होईल. समजा तुम्हाला त्यावर सुमारे ७-८% वार्षिक व्याज मिळेल. अशा परिस्थितीत, तुमचं पेन्शन सुमारे ३,१९,१०५ - ३,६४,६९२ रुपये वार्षिक म्हणजेच २६,५९२ - ३०,३९१ रुपये मासिक असेल.

१००% रकमेवर किती पेन्शन असेल

जर तुम्ही तुमचा संपूर्ण निधी पेन्शनसाठी गुंतवला तर तुम्हाला दरमहा खूप चांगलं पेन्शन मिळेल. जर तुम्हाला १,१३,९६,६२७ रुपयांच्या एकूण निधीवर ७-८ टक्के व्याज मिळालं तर तुमचं वार्षिक पेन्शन सुमारे ७,९७,७६४-९,११,७३० रुपये असेल. दुसरीकडे, जर तुम्ही मासिक आधारावर पाहिलं तर तुमचे पेन्शन सुमारे ६६,४८०-७५,९७७ रुपये असेल.

या गोष्टी लक्षात ठेवा

हे कॅलक्युलेश आदर्श परिस्थिती लक्षात घेऊन केली आहे. येथे आपण असं गृहीत धरत आहोत की वयाच्या ३० व्या वर्षी त्या व्यक्तीला चांगली नोकरी मिळाली असेल आणि निवृत्तीसाठी नियोजन सुरू केलं असेल. जर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पेन्शन जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या आधारावर वय वाढवून किंवा कमी करून गणना करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकाच तुम्हाला निवृत्तीवर जास्त फायदा मिळेल.

Web Title: If you invest rs 5000 per month in NPS how much pension will you get on retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.