ICICI Prudential AMC IPO Allotment: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आज संपणार आहे. शेअर्सचे वाटप आज, १७ डिसेंबर रोजी अंतिम केलं जाणार असून, गुंतवणूकदारांना त्यांना शेअर्स मिळाले आहेत की नाही हे आज स्पष्ट होईल. १०,६०२ कोटी रुपयांचा हा आयपीओ २०२५ मधील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक आहे. याचं सबस्क्रिप्शन मंगळवारी बंद झालं असून, १९ डिसेंबर रोजी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर याची लिस्टिंग होणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये तेजी
शेअर्सचे वाटप होण्यापूर्वीच ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सुमारे १७% किंवा ३६८ रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, शेअर्सची लिस्टिंग किंमत ₹२,५०० च्या वर असू शकते. या आयपीओसाठी प्रति शेअर २,१६५ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. जीएमपीवरून लिस्टिंगच्या दिवशी चांगल्या नफ्याचे संकेत मिळत असले, तरी प्रत्यक्ष फायदा हा बाजारातील वातावरण आणि कंपनीच्या दीर्घकालीन कामगिरीवर अवलंबून असेल.
अलॉटमेंट स्टेटस कसा तपासायचा?
गुंतवणूकदार अनेक प्रकारे त्यांचे स्टेटस तपासू शकतात. सर्वात सोपा मार्ग म्हणजे या आयपीओचे रजिस्ट्रार Kfin Technologies च्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्टेटस पाहू शकता.
- Kfin Technologies च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ड्रॉपडाउन मेनूमधून 'ICICI Prudential AMC' निवडा.
- तुमचा पॅन (PAN), ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID एन्टर करा.
- 'Submit' बटण दाबून तुमचे अलॉटमेंट स्टेटस तपासा.
BSE च्या वेबसाइटवर:
- 'Issue Type' मध्ये 'Equity' निवडा.
- ड्रॉपडाउनमधून 'ICICI Prudential AMC' निवडा.
- तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाका.
- 'Search' वर क्लिक करून तुम्हाला डिटेल्स पाहता येतील.
- जर तुम्ही ब्रोकरच्या माध्यमातून अर्ज केला असेल, तर त्यांच्या ट्रेडिंग ॲपवरही तुम्हाला स्टेटस पाहता येईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
