Lokmat Money > बिझनेस न्यूज > ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ

ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ

Dividend Stock : आयसीआयसीआय बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:13 IST2025-08-11T13:12:39+5:302025-08-11T13:13:20+5:30

Dividend Stock : आयसीआयसीआय बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.

ICICI Bank Declares ₹11 Dividend Record Date on August 12, 2025 | ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ

ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ

Dividend Stock : खासगी क्षेत्रातील मोठी बँक ICICI बँक आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देणार आहे. बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ११ रुपयाचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे. ICICI बँकेच्या या निर्णयाने शेअर धारकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

लाभांश मिळवण्यासाठी आजच खरेदी करा
१२ ऑगस्ट रोजी ICICI बँकेचे शेअर्स 'एक्स-डिव्हिडंड' ट्रेडिंग करतील. याचा अर्थ, जर तुम्हाला या लाभांशाचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही आज, ११ ऑगस्ट २०२५ रोजीच शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे. कारण मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी खरेदी केलेल्या शेअर्सवर हा लाभांश मिळणार नाही. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये ICICI बँकेचे शेअर्स असतील, त्यांना हा लाभांश मिळेल.

३० ऑगस्टला अंतिम निर्णय
ICICI बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति शेअर २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर ११ रुपये (५५० टक्के) लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) ३० ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.

वाचा - सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?

आजच्या शेअर बाजारातील स्थिती
सोमवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०४ वाजता ICICI बँकेचे शेअर्स बीएसईवर १४२६.४० रुपयांवर व्यवहार करत होते. यात १०.०५ रुपयाची (०.७०%) ची घसरण झाली होती. आजच्या व्यवहारादरम्यान, शेअर्सने १४१९.८५ रुपयांचा नीचांक आणि १४३१.९५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. बँकेचे ५२ आठवड्यांचा नीचांक ११५३.३० रुपये आणि उच्चांक १४९४.१० रुपये आहे. ICICI बँकेचे सध्याचे बाजार भांडवल १०,१७,८४०.०७ कोटी  रुपये आहे.

 

Web Title: ICICI Bank Declares ₹11 Dividend Record Date on August 12, 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.