Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा

Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा

किंगफिशर एअरलाइन्सच्या बुडण्यावर मल्ल्यानं भाष्य करत माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यावर निशाणा साधला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:22 IST2025-06-06T13:21:06+5:302025-06-06T13:22:18+5:30

किंगफिशर एअरलाइन्सच्या बुडण्यावर मल्ल्यानं भाष्य करत माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यावर निशाणा साधला.

I went to Pranab Mukherjee vijay mallya s big claim on bank loan kingfisher airlines | Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा

Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा

एकेकाळी उद्योगजगतातील बड्या व्यक्तींपैकी एक असलेल्या विजय मल्ल्याला आता फरार म्हटलं जातं. मल्ल्याचे ब्रिटनमधून प्रत्यार्पण करण्याचाही भारताचा प्रयत्न आहे. दरम्यान, किंगफिशर एअरलाइन्सच्या बुडण्यावर मल्ल्यानं भाष्य करत माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यावर निशाणा साधला. जेव्हा कंपनीची वाईट अवस्था होती तेव्हा आपण प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो, असं तो म्हणाला.

राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या मल्ल्यानं २००८ मधील जागतिक आर्थिक संकटाचा उल्लेख केला. "२००८ पर्यंत ते आमच्या बाजूनं काम होत होतं, हे मी मान्य करतो. त्यानंतर काय झालं? सोपं आहे. लेहमन बंधूंचं नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का? आपण कधी जागतिक आर्थिक संकटाबद्दल ऐकलं आहे का? त्याचा भारतावर परिणाम झाला नाही का? त्याचा खूप परिणाम झालाय," असा मल्ल्यानं म्हटलं. प्रत्येक क्षेत्राला याचा फटका बसला. भारतीय रुपयालाही याचा फटका बसला होता, असं त्यानं सांगितलं.

Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी

प्रणव मुखर्जींचा उल्लेख का?

किंगफिशर एअरलाईन्स संकटात सापडल्याच्या घटनेवर मल्ल्यानं वक्तव्य केलं. "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो आणि एक समस्या असल्याचं सांगितलं होतं. किंगफिशर एअरलाइन्सचं काम कमी करण्याची गरज असल्याचं सांगितलं. विमानांची संख्या कमी करणं, कर्मचाऱ्यांची कपात करण्याची गरज आहे, अशा आर्थिक परिस्थितीत आम्ही काम करू शकत नाही," असं म्हटल्याचं मल्ल्यानं नमूद केलं.

"मला काम कमी करण्यापासून मनाई करण्यात आली. तुम्ही काम सुरू ठेवा, बँका मदत करतील असं सांगितलं. हे सर्वा असंच सुरू झालं. किंगफिशर एअरलाईन्सला सर्व विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली. त्यानंतर समस्या आणखी वाढल्या. ज्यावेळी लोन मागितलं तेव्हा कंपनी चांगली कामगिरी करत नव्हती," असंही तो म्हणाला.

चोर म्हणू नका

"जर जनतेला मला फरार म्हणायचं असेल तर तसे करा, पण मी पळून गेलेलो नाही. मी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आलो होतो. मी परतलो नाही हे खरं आहे, पण त्यासाठी माझी स्वतःची कारणं आहेत जी मी योग्य मानतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मला फरार म्हणायचं असेल तर तसं करा. पण चोर कुठून आलं? चोरी कुठे आहे?" असं विजय मल्ल्यानं आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर म्हटलं.

Web Title: I went to Pranab Mukherjee vijay mallya s big claim on bank loan kingfisher airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.