Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम

Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम

Post Office FD : जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ही सुविधा आता मोबाईलवर ऑनलाईन उपलब्ध आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:55 IST2024-12-06T14:54:46+5:302024-12-06T14:55:28+5:30

Post Office FD : जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ही सुविधा आता मोबाईलवर ऑनलाईन उपलब्ध आहे

how to open post office fd account online for investment check process | Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम

Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम

Post Office FD : बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, एफडी, पीपीएफ आणि इतर अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला बँकेत एफडीमध्ये पैसे गुंतवायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन करू शकता, त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे घरी बसून करता येईल का? लोकांना याबाबत फारशी माहिती नाही. पोस्ट ऑफिसमध्येही तुम्हाला सर्व कामे ऑनलाइन करण्याची सुविधा दिली जाते. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit) खाते उघडू शकता.

कसं उघडायचं ऑनलाइन खातं?

  • पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते उघडण्याची सुविधा इंट्रा ऑपरेटेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे प्रदान केली जाते.
  • यासाठी तुम्हाला नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्ड वापरून पोस्ट ऑफिस ई-बँकिंग (https://ebanking.indiapost.gov.in) वर लॉग इन करावे लागेल.
  • यानंतर, 'जनरल सर्व्हिसेस' पर्यायावर जा आणि 'सर्व्हिस रिक्वेस्ट' वर क्लिक करा आणि ते उघडा.
  • यानंतर, 'न्यू रिक्वेस्ट' पर्यायावर जा आणि टाइम डिपॉझिट खाते उघडण्यासाठी अर्ज करा.
  • यामध्ये तुम्हाला सक्रिय बचत खाते, पॅन कार्ड, केवायसी डॉक्युमेंट, सक्रिय DOP ATM किंवा डेबिट कार्ड आणि मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादीसारखे काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील.
  • सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर दिलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर, तुमचे खाते उघडले जाईल.

१, २, ३ आणि ५ वर्षांसाठी FD सुविधा
पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी एफडी सुविधा दिली जाते. सर्वांचे व्याजदर देखील कार्यकाळानुसार वेगवेगळे असतात. सध्या एका वर्षाच्या एफडीवर ६.९%, दोन वर्षांच्या एफडीवर ७.०%, तीन वर्षांच्या एफडीवर ७.१% आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% व्याज दिले जात आहे. यामध्ये गुंतवणूक १,००० रुपयांपासून सुरू करता येते, जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते.

Web Title: how to open post office fd account online for investment check process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.