Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधार कार्डचा गैरवापर होण्याची भिती? तुमची महत्त्वाची माहिती घरबसल्या करा लॉक

आधार कार्डचा गैरवापर होण्याची भिती? तुमची महत्त्वाची माहिती घरबसल्या करा लॉक

How to lock aadhaar biometric : आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर करुन कर्ज काढल्याची काही प्रकरणे समोर आली आहे. तुमच्यासोबत असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:11 IST2025-03-04T12:10:13+5:302025-03-04T12:11:56+5:30

How to lock aadhaar biometric : आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर करुन कर्ज काढल्याची काही प्रकरणे समोर आली आहे. तुमच्यासोबत असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता.

how to lock aadhaar biometric through sms maadhaar or uidai portal online | आधार कार्डचा गैरवापर होण्याची भिती? तुमची महत्त्वाची माहिती घरबसल्या करा लॉक

आधार कार्डचा गैरवापर होण्याची भिती? तुमची महत्त्वाची माहिती घरबसल्या करा लॉक

lock aadhaar biometric : सध्या देशात आधार कार्डशिवाय तुमचं पानही हलणार नाही. सरकारी कामापासून खाजगी कामांपर्यंत आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र बनलं आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांच्या आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर होतो. त्यामुळे कुठेही आधार कार्ड देण्यापूर्वी काळजी घ्या. ओळखपत्र म्हणून तुम्ही इतर कागदपत्रे जसे की ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदार ओळखपत्र दाखवू शकता. जर आधार कार्ड द्यावे लागत असेल तर मास्क आधार कार्ड द्यावे. तुमची सर्व माहिती आधार कार्डमध्ये असते. अशा परिस्थितीत तुम्ही हे तपशील लॉक करूनही आधार कार्ड वापरू शकता. कसे ते आम्ही सांगतो.

आधार लॉक करायचं म्हणजे काय?
तुम्ही तुमचा आधार बायोमेट्रिक तपशील लॉक करू शकता. यामध्ये फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेस डेटा यांसारखी माहिती असते. ही सिक्योरिटी फीचर्स आहेत. हे तपशील लॉक केल्यास तुमच्या परवानगीशिवाय कोणीही आयडी पडताळणी, आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही फसवणुकीपासून वाचाल. तुमच्या आधारचे बायोमेट्रिक तपशील लॉक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि 'VID जनरेटर' पर्यायातून व्हर्च्युअल आयडी जनरेट करावा लागेल.

आधार कार्ड लॉक करण्यासाठी ही प्रक्रिया वापरा

  • UIDAI myAadhaar पोर्टलवर बायोमेट्रिक लॉकसाठी, https://resident.uidai.gov.in/bio-lock ला भेट द्या.
  • आता खालील 'लॉक/अनलॉक आधार' या पर्यायावर क्लिक करा.
  • पहिल्या स्टेपमध्ये, 'Click Here to Generate VID' वर क्लिक करून व्हर्च्युअल आयडी जनरेट करा.
  • व्हर्च्युअल आयडी जनरेट झाल्यावर, त्याच पानावर परत या.
  • आता 'Next' पर्यायावर क्लिक करा. येथे लॉक आधार निवडा आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • आता Send OTP वर क्लिक करून OTP व्हेरीफाय करा.
  • पडताळणीनंतर तुमचे आधार बायोमेट्रिक लॉक होईल.

mAadhaar अ‍ॅपवरुनही लॉक करू शकता

  • Google Play Store किंवा Apple App Store ला भेट देऊन mAadhaar अ‍ॅप डाउनलोड करा.
  • आता नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासह अ‍ॅपमध्ये लॉग इन करा.
  • यानंतर 'my aadhaar' आयकॉनवर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि OTP व्हेरीफाय करा.
  • तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी, 'बायोमेट्रिक लॉक' पर्यायावर क्लिक करा. यामुळे तुमचा आधार लॉक होईल. 

SMS द्वारेही बायोमेट्रिक्स असे लॉक करा

  • तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर [GETOTP (स्पेस) आधार शेवटचे ४ अंक] संदेश पाठवा.
  • तुमचा फोन नंबर एकाहून अधिक आधार क्रमांकांशी जोडलेला असल्यास, शेवटच्या ४ ऐवजी शेवटचे ८ अंक वापरा.
  • एसएमएसद्वारे ओटीपी व्हेरीफाय करा.
  • यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक केले जाईल.

Web Title: how to lock aadhaar biometric through sms maadhaar or uidai portal online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.