Lokmat Money > बिझनेस न्यूज > Kisan Credit Card काय आहे? यावर किती मिळतंय कर्ज? जाणून घ्या...

Kisan Credit Card काय आहे? यावर किती मिळतंय कर्ज? जाणून घ्या...

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील ५ वर्षांची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:16 IST2024-12-18T15:12:45+5:302024-12-18T15:16:05+5:30

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील ५ वर्षांची आहे.

how to apply for kisan credit card or kcc scheme what is the interest rate | Kisan Credit Card काय आहे? यावर किती मिळतंय कर्ज? जाणून घ्या...

Kisan Credit Card काय आहे? यावर किती मिळतंय कर्ज? जाणून घ्या...

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही शेतकऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली. याद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज दिले जाते. 

या योजनेत शेतकऱ्यांना ४ टक्के इतक्या किफायतशीर व्याजदराने कर्ज दिले जाते. या योजनेतील अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा नाही. या योजनेंतर्गत कमाल ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. कर्जाची कमाल मुदत ५ वर्षे आहे. किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील ५ वर्षांची आहे.

पूर्वी किसान क्रेडिट कार्ड योजनेत १.६० लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी हमी आवश्यक होती. आता अलीकडेच आरबीआयने हमीमुक्त कर्जाची मर्यादा २ लाख रुपये केली आहे. म्हणजेच, तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.

किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या कर्जासाठी अर्ज कसा करावा?
- तुम्हाला ज्या बँकेतून किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्या बँकेच्या वेबसाइटवर जा.
- येथे तुम्ही ऑप्शनच्या लिस्टमधून किसान क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा.
- आता Apply वर क्लिक केल्यावर वेबसाइट तुम्हाला ॲप्लिकेशन पेजवर घेऊन जाईल.
- आवश्यक डिटेल्ससह फॉर्म भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- आता तुम्हाला एक अॅप्लिकेशन रेफ्रेंस नंबर मिळेल. तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास, बँक तुमच्याशी ३ ते ४ कामकाजाच्या दिवसांत संपर्क करेल.

आवश्यक कागदपत्रे...
1. अॅप्लिकेशन फॉर्म
2. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
3. आयडी पुरावा - ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट
4. पत्त्याचा पुरावा - ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड
5. महसूल अधिकाऱ्यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या जमिनीचा पुरावा
6. क्रॉप पॅटर्न (पीक घेतले)
7. २ लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी सिक्युरिटी डॉक्यूमेंट्स
 

Web Title: how to apply for kisan credit card or kcc scheme what is the interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.