Kisan Credit Card : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त ३ लाख रुपये होती.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. तसेच, देशातील लाखो शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतील. किसान क्रेडिट कार्डसोबतच बचत खात्याचाही लाभ मिळत आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि शेतकऱ्यांना हे कार्ड १५ दिवसांच्या आत मिळते. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या...
किसान क्रेडिट कार्डचे फायदे
किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. आता ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. म्हणजे जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला ३ टक्के अनुदान मिळते.
अशाप्रकारे ऑफलाइन अर्ज करू शकता
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी बँका, पंचायत आणि जिल्हा प्रशासन एकत्र काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल. बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्याकडून किसान क्रेडिट कार्ड अर्ज फॉर्म घ्यावा लागेल. यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत कार्ड मिळते.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- तुमच्या पसंतीच्या बँकेच्या वेबसाइटवर जा.
- होम पेजवर किसान क्रेडिट कार्डचा ऑप्शन दिसेल.
- येथे अर्ज केल्यानंतर, तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.
- येथे तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावे लागतील.
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल.
- जर तुम्ही या कार्डसाठी पात्र असाल, तर बँक तुमच्याशी ५ दिवसांच्या आत संपर्क साधेल.
आवश्यक कागदपत्रे...
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- वाहन चालविण्याचा परवाना
- शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे