lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > करदात्याने नवीन इन्कम टॅक्स रिटर्नची पतंग कशी उडवावी?

करदात्याने नवीन इन्कम टॅक्स रिटर्नची पतंग कशी उडवावी?

कृष्णा, मकरसंक्रांतीची पूर्वसंध्या पतंग उडवून साजरी करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 07:33 AM2020-01-13T07:33:43+5:302020-01-13T07:35:34+5:30

कृष्णा, मकरसंक्रांतीची पूर्वसंध्या पतंग उडवून साजरी करतात.

How to tax a taxpayer a new income tax return | करदात्याने नवीन इन्कम टॅक्स रिटर्नची पतंग कशी उडवावी?

करदात्याने नवीन इन्कम टॅक्स रिटर्नची पतंग कशी उडवावी?

सीए - उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, मकरसंक्रांतीची पूर्वसंध्या पतंग उडवून साजरी करतात. यावर्षी नवीन इन्कम टॅक्स रिटर्न सीबीडीटीने अधिसूचित केले. नवे आयटीआर करदात्याद्वारे कसे भरले जातील?
कृष्ण : (काल्पनिक पात्र): सरकारद्वारे नेहमीच वेगवेगळे बदल केले जातात. करदात्यांना सरकारने म्हटले ‘‘तीळगूळ घ्या, कर लवकर द्या.’’ आपण कायदा आणि पतंग उडविण्याची तुलना केली, तर पतंग उडविणारी व्यक्ती ‘व्यापारी’, पतंग म्हणजे ‘इन्कम टॅक्स रिटर्न’, चक्री म्हणजे ‘बुक आॅफ अकाउंट्स’ हवा म्हणजे ‘टॅक्स कलेक्शन’, पतंग कापणे म्हणजे ‘असेसमेंट आणि स्क्रूटिनी’ आणि मांज्या म्हणजे कायदा. परंतु, यावर्षी सरकारने बाजारात नवीन ई-असेसमेंटचा नवीन मांज्या आणला आहे आणि सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे (ढिल) कर सल्लागार आहे.
अर्जुन : आयटीआरचा-१ पतंग कोणता करदाता उडवू शकतो आणि कोणता नाही आणि या पतंगाची (आयटीआर-१) नवी वैशिष्ट्ये कोणती?
कृष्ण : ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपर्यंत असेल व उत्पन्न हे पगारातून आणि एका घरातून असेल अशा करदात्यांना आयटीआर-१चा पतंग उडवता येईल. जे करदाते आयटीआर-१चा पतंग उडवू शकत नाही ते म्हणजे कंपनीमधील डायरेक्टर किंवा ज्या करदात्यांनी अनलिस्टेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे किंवा इन्कम फॉर्म हाऊस प्रॉपर्टीमधील ब्रॉड फॉरवर्ड लॉस असलेले करदाते किंवा एकापेक्षा जास्त घरमालकी असलेले करदाते. आयटीआर-१ पतंगाची नवी वैशिष्ट्ये अशी : १. ज्या करदात्यांकडे पासपोर्ट क्रमांक त्यांनी तो प्रदान करणे अनिवार्य आहे. २. नवीन आयटीआर-१ मध्ये रोजगाराचे स्वरूप प्रदान करणे आवश्यक नाही. ३. सर्व एम्प्लॉयरकडून मिळणारी एकूण ग्रॉस सॅलरी प्रदान केली पाहिजे. पूर्वी करदाते सगळ्या एम्प्लॉयरकडून मिळणारा एकूण पगार एका कॉलममध्ये प्रदान करू शकत होता. ४. मालमत्तेच्या पत्त्याची माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. जर मालमत्ता भाड्याने दिली असेल तर भाडेकरूंचे नाव, पॅन किंवा आधार या सर्वांनी माहिती दाखल करणे गरजेचे आहे ५. इन्कम फॉर्म हाउस प्रॉपटीमध्ये जे भाडे करदात्यास मिळाले नाही त्यासंबंधीची माहिती प्रदान केली पाहिजे. ६. इन्कम फॉर्म आॅदर सोर्सेसमध्ये सेक्शन ५७ (४) द्वारे मिळणाऱ्या डिडक्शनची नोंद आवश्यक आहे. ७. सेक्शन ८० मध्ये मिळणाºया डिडक्शनची विभागानुसार नोंद करणे आवश्यक आहे.
अर्जुन : आयटीआर-४ चे पतंग कोण उडवू शकतात, कोण उडवू शकत नाही आणि या पतंगाची (आयटीआर-४) नवी वैशिष्ट्ये कोणते?
कृष्ण : अर्जुना, जे करदाते वैयक्तिक किंवा एचयूएफ आहेत, ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे आणि ते इन्कम टॅक्स प्रिझमटिव्ह बेसीसवर भरतात ते करदाते आयटीआर-४ चे पतंग उडवितात.
आयटीआर-४ च्या पतंगाची नवी वैशिष्ट्ये अशी : १. ज्या करदात्यांकडे पासपोर्ट क्रमांक त्यांनी तो प्रदान करणे अनिवार्य आहे. २. सेक्शन १३९ (१) मधील प्रोव्हीझो ७ म्हणजे करदाते ज्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची गरज नाही. परंतु, ज्या करदात्यांनी खालील खर्च केले असेल तर त्यांना रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे. अ. करदात्याने एक किंवा अधिक चालू खात्यात १ कोटीपेक्षा अधिक पैसे जमा केले असतील, तर त्यांना त्या संबंधित माहिती देणे गरजेचे आहे. ब. करदात्याने स्वत: कर किंवा दुसºया एखाद्या व्यक्तीवर विदेशात खर्च केला असेल, तर त्याची माहिती देणे गरजेचे आहे. क. जर करदात्याने वीजबिलावर १ लाखापेक्षा अधिक खर्च केला
असेल त्याची माहिती प्रदाने करणे आवश्यक आहे.
३. जर एखाद्या फर्ममध्ये करदाता भागीदार असल्यास खालील तपशील देणे आवश्यक आहे. अ. फर्मचे नाव. ब. पॅन ४. जे भागीदार पार्टनरशीप फर्म मध्ये भागीदार होते त्यांनी पुढील माहिती द्यावी. १. नाव आणि पत्ता २. पार्टनरशीपमधील हिस्सा ३. पॅन ४. आधार कार्ड ५. रेट आॅफ इन्टरेस्ट आॅन कॅपिटल ६. रेमुनरेशन पेड/पेअबल.
५. सर्व एम्पलॉयरकडून मिळालेल्या एकूण ग्रॉस सॅलरीची माहिती आवश्यक आहे. ६. मालमत्तेच्या पत्त्याची माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. जर मालमत्ता भाड्याने दिली तर भाडेकरूंचे नाव, पॅन किंवा आधार या सर्वांची माहिती दाखल करणे गरजेचे आहे. ७. इन्कम फॉर्म हाउस प्रॉपटीत जे भाडे करदात्यास मिळाले नाही त्यासंबंधीची माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. ८. इन्कम फॉर्म आॅदर सोर्सेसमध्ये सेक्शन ५७ (४) द्वारे मिळणाºया डिडक्शनची नोंद आवश्यक आहे. ९. सेक्शन ८० मध्ये मिळणाºया डिडक्शनची विभागानुसार नोंद करणे आवश्यक आहे.
अर्जुन : करदाता आणि कर अधिकाऱ्यांमध्ये ‘पैज’सारखी परिस्थिती केव्हा निर्माण होईल?
कृष्ण : खालील परिस्थितीमध्ये करदाता आणि कर अधिकाºयांमध्ये पैज निर्माण होईल: १. जर करदात्याने एक किंवा अधिक चालू खात्यामध्ये १ करोडपेक्षा अधिक पैसे जमा केले असतील, तर त्यांना त्या संबंधितील माहिती देणे गरजेचे आहे.
२. करदात्याने स्वत: कर किंवा दुसºया एखाद्या व्यक्तीवर विदेशात खर्च केला, तर त्याची माहिती देणे गरजेचे आहे. ३. करदात्याने वीज बिलावर १ लाखापेक्षा अधिक खर्च केला तर त्याची माहिती द्यावी लागेल. ४. ज्या करदात्यांनी प्रिझमटीव्ह बेसिसवर किंवा ज्यांनी बुक्स आॅफ अकाउंट्स सांभाळली नाहीत त्यांनी कॅश आणि बँकची माहिती द्यावी.
ब. मागील वर्षातील बँक आणि कॅशमधील पावती क. मागील वर्षातील कॅश आणि बँकांमधून दिलेली रक्कम किंवा कॅश किंवा बँकमधून काढलेले पैसे. ड. कॅश आणि बँकचे क्लोझिंग बॅलेन्स करदात्यांनी आयटीआर-४ दाखल करतांना विशेष काळजी घ्यावी. कारण, त्यामधील झालेल्या चुकीचा परिणाम उत्पन्नावर होईल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांनाच पतंग आयटीआर-१ सुरक्षितपणे उडू शकतो. कारण त्यातील बदल जास्त परिणाम नसणारे आहे. पण आयटीआर-४ चा पतंग हा नगद आणि पतपेढीतील मिळकत आणि पैसे काढणे मुळे अति सतर्कतेत आहे.

 

Web Title: How to tax a taxpayer a new income tax return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर