Tata Nexon On EMI: भारतातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV पैकी एक असलेली टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आज आपल्या ५-स्टार सुरक्षा रेटिंग आणि दमदार लूकमुळे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंती बनली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. जर तुम्हीही ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर मार्च २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार आणि किमतींच्या आधारे, ही कार घरी आणण्यासाठी तुमचं बजेट आणि मासिक उत्पन्न किती असावं, हे जाणून घेऊया.
टाटा नेक्सॉनच्या किमती आणि ऑन-रोड खर्च
सध्या टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत सुमारे ७.३२ लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी १४.१५ लाख रुपयांपर्यंत जाते. जर आपण नोएडा किंवा दिल्लीसारख्या शहरांमधील ऑन-रोड किमतीबद्दल (ज्यामध्ये आरटीओ, विमा आणि इतर करांचा समावेश आहे) बोललो, तर बेस मॉडेल सुमारे ८.६१ लाख रुपयांच्या आसपास पडतं.
दरमहा किती ईएमआय भरावा लागेल?
समजा तुम्ही टाटा नेक्सॉनचे बेस मॉडेल 'Smart 1.2 Petrol (MT)' खरेदी करण्याचे ठरवलं, तर त्याचं गणित खालीलप्रमाणे असेल:
- ऑन-रोड किंमत: ₹८.६१ लाख (अंदाजे)
- डाऊन पेमेंट: ₹१.६१ लाख
- कर्जाची रक्कम: ₹७,००,०००
- व्याजदर: ९% (सरासरी बँक दर)
- कर्जाचा कालावधी: ५ वर्षे (६० महिने)
या हिशोबानं तुमचा मासिक हप्ता (EMI) साधारणपणे १४,५३१ रुपये होईल. जर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवून ७ वर्षे केला, तर हा ईएमआय कमी होऊन सुमारे ११,२६२ रुपये होईल, परंतु तुम्हाला व्याज जास्त द्यावं लागेल.
तुमचा पगार किती असावा?
आर्थिक तज्ज्ञांच्या '२०/४/१०' नियमानुसार, तुमच्या कारचा ईएमआय तुमच्या हातातील मासिक पगाराच्या १५% ते २०% पेक्षा जास्त नसावा, जेणेकरून तुमच्या घरगुती खर्चावर आणि गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही. बेस मॉडेलसाठी, जर तुम्ही १६,६०० रुपयांचा ईएमआय भरत असाल, तर तुमचा मासिक पगार किमान ७५,००० ते ८५,००० रुपयांच्या दरम्यान असावा. त्याच वेळी, जर तुम्ही नेक्सॉनचे टॉप-एंड डिझेल किंवा ऑटोमॅटिक व्हेरिएंट घेतले, ज्याचा ईएमआय २८,००० रुपयांच्या वर जाऊ शकतो, तर तुमचा पगार प्रति महिना १.३० लाख ते १.५० लाख रुपये असणं आवश्यक आहे.
