PNB FD Rates: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाच्या वाढत्या लोकप्रियतेनंतरही सामान्य नागरिक बँक एफडीलाच गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग समजतात. याचं मुख्य कारण म्हणजे एका निश्चित कालावधीनंतर व्याजासह मिळणारा खात्रीशीर परतावा. पंजाब नॅशनल बँक ही देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असून, सध्या ही बँक ग्राहकांना ३.०० टक्के ते ७.४० टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे.
पीएनबीमध्ये ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी गुंतवणूक करता येते. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार ७ दिवसांच्या एफडीवर ३.०० ते ३.८० टक्के व्याज मिळतं, तर ९१ दिवसांसाठी ४.९० ते ५.७० टक्के व्याज दिलं जातं. ३०३ दिवसांच्या योजनेवर ५.५५ ते ६.३५ टक्के व्याज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ४४४ दिवसांच्या स्पेशल एफडी स्कीमवर बँक सर्वाधिक ६.६० ते ७.४० टक्के व्याज देत असून ही योजना बँकेनं नुकतीच सुरू केली आहे. ६० महिन्यांच्या (५ वर्षे) योजनेवर ६.१० ते ६.९० टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं.
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
५ वर्षांसाठी २ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळणारा परतावा
जर एखाद्या सामान्य नागरिकाने पीएनबीमध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले, तर त्याला ७०,७०१ रुपयांच्या व्याजासह एकूण २,७०,७०१ रुपये मिळतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा परतावा अधिक असून त्यांना ७७,४४५ रुपये व्याजासह एकूण २,७७,४४५ रुपये मिळतील. अति ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ८१,५६८ रुपये व्याज मिळून मॅच्युरिटीच्या वेळी एकूण २,८१,५६८ रुपये हाती येतील. ही आकडेवारी ५ वर्षांच्या कालावधीसाठी लागू असलेल्या निश्चित व्याजदरांवर आधारित आहे.
