Hero Splendor On EMI: टू-व्हीलर बनवणाऱ्या कंपन्यांमधील मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पची (Hero MotoCorp) हीरो स्प्लेंडर (Hero Splendor) बाईक भारतात खूप लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा एखादी परवडणारी बाईक खरेदी करण्याचा विचार येतो, तेव्हा बहुतेक लोक हीरो स्प्लेंडरलाच प्राधान्य देतात. अनेक वर्षांपासून हीरो स्प्लेंडर बाईक लोकांची पहिली पसंती बनलेली आहे. ही बाईक प्रत्येकाच्या बजेटमध्ये सहज बसते, ज्यामुळे ती लोकांना खूप आवडते. जर तुम्ही देखील कमी किमतीत बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीरो स्प्लेंडरसाठी डाऊनपेमेंट आणि ईएमआय किती लागेल हे जाणून घेऊ.
हीरो स्प्लेंडरची किंमत
सर्वात आधी हीरो स्प्लेंडरच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, हीरो स्प्लेंडर बाईकच्या बेस व्हेरियंट हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स-शोरूम किंमत ७३,९०२ रुपये आहे. जर तुम्ही हीरो स्प्लेंडर दिल्लीत खरेदी केली, तर तुम्हाला ६,००० रुपये आरटीओ (RTO) आणि ६,००० रुपये इन्शुरन्सचे (Insurance) द्यावे लागतील. इतर शुल्क मिळून हिरो स्प्लेंडर तुम्हाला एकूण ८८,००० रुपयांना पडेल.
हीरो स्प्लेंडर बाईकचं डाऊन पेमेंट
जर तुम्हाला हीरो स्प्लेंडर बाईक डाऊन पेमेंटसह खरेदी करायची असेल, तर तुम्हाला किमान ५,००० रुपये इतके डाऊन पेमेंट करावं लागेल. यापेक्षा कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्ही हीरो स्प्लेंडर खरेदी करू शकत नाही.
हीरो स्प्लेंडर बाईकचा मंथली EMI
जर तुम्ही २०,००० रुपयांच्या डाऊन पेमेंटसह हीरो स्प्लेंडर खरेदी केली, तर तुम्हाला बँकेकडून ६८,००० रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल. जर हे कर्ज तुम्हाला २ वर्षांच्या कालावधीसाठी ९ टक्के व्याजदरानं मिळाले, तर तुम्हाला दरमहा ३,१७० रुपये EMI म्हणून भरावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही बँकेला एकूण ७६,००० रुपये परत कराल. यामध्ये ८,००० रुपये व्याजाचे समाविष्ट असतील. त्यामुळे, ही हीरो स्प्लेंडर तुम्हाला एकूण ८,००० रुपये महाग पडेल.