Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

EPFO Investment : पीएफ हा प्रत्येक नोकरदाराच्या पगाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण, तुमच्या पगारातून कापले जाणारे हे पैसे नेमके कुठे जातात, याची तुम्हाला माहिती आहे का? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 17:14 IST2025-08-03T16:41:13+5:302025-08-03T17:14:11+5:30

EPFO Investment : पीएफ हा प्रत्येक नोकरदाराच्या पगाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण, तुमच्या पगारातून कापले जाणारे हे पैसे नेमके कुठे जातात, याची तुम्हाला माहिती आहे का? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.

How is Your PF Money Invested? Understanding the EPFO Investment Strategy | तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

EPFO Investment : तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा पीएफ (PF) कापला जात असेल, तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की हे पैसे कुठे जातात? कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना फक्त हे पैसे गोळा करत नाही, तर ते तुमच्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करते, जेणेकरून तुम्हाला निवृत्तीच्या वेळी एक चांगली रक्कम आणि पेन्शन मिळू शकेल.

पीएफचे पैसे कसे विभागले जातात?
पीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनी (मालक) दोघेही दरमहा तुमच्या मूळ पगाराच्या १२% रक्कम योगदान देतात.
कर्मचाऱ्याचे योगदान (१२%)
तुमच्या पगारातून कापलेले हे १२% पैसे पूर्णपणे तुमच्या ईपीएफ (EPF) खात्यात जमा होतात. यावर दरवर्षी व्याज मिळते.

कंपनीचे योगदान (१२%)
कंपनीने दिलेले १२% योगदान तीन भागांमध्ये विभागले जाते.
८.३३% रक्कम ईपीएस (EPS - पेन्शन योजना) मध्ये जाते.
३.६७% रक्कम तुमच्या ईपीएफ खात्यात जमा होते.
याशिवाय, कंपनीकडून ईडीएलआय (EDLI - विमा योजना) मध्येही थोडे योगदान दिले जाते.

उदाहरणार्थ, जर तुमचा मूळ पगार १६,००० रुपये असेल, तर तुमच्या आणि कंपनीच्या बाजूने प्रत्येकी १,९२० रुपये जमा होत असतील तर यातले फक्त ५८७ रुपये ईपीएफ खात्यात दिसतील, कारण उरलेली रक्कम पेन्शन आणि विमा योजनांमध्ये जाते.

ईपीएफओ तुमच्या पैशांची गुंतवणूक कुठे करते?
ईपीएफओ तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे थेट स्वतःकडे ठेवत नाही. ते तुमच्या पैशांची सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करते.
सरकारी रोखे आणि सिक्युरिटीज : ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
कॉर्पोरेट रोखे: यात सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांचे रोखे असतात, जिथे परतावा मिळण्याची शक्यता थोडी जास्त असते.
ईटीएफ : गेल्या काही वर्षांपासून, ईपीएफओ त्यांच्या निधीपैकी १५% रक्कम शेअर बाजाराशी जोडलेल्या एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवत आहे.

पेन्शन आणि विम्याचाही लाभ

  • पेन्शन (EPS) : जर तुम्ही १० वर्षांसाठी पीएफ योजनेत योगदान दिले असेल, तर ५८ वर्षांच्या वयानंतर तुम्हाला ईपीएसमधून मासिक पेन्शन मिळू शकते.
  • विमा (EDLI): जर कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला, तर ईडीएलआय योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळतो. हे योगदानही कंपनीच देते.

वाचा - फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा

तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी काळ काम केले असेल आणि तुमचे पीएफ खाते बंद करत असाल, तर तुम्ही फॉर्म १०सी भरून ईपीएसचा पैसा काढू शकता. पण, १० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिल्यावर तुम्ही ईपीएसचे पैसे काढू शकत नाही, कारण तुम्ही पेन्शनसाठी पात्र बनता. ही योजना तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.

Web Title: How is Your PF Money Invested? Understanding the EPFO Investment Strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.