नवी दिल्ली : २०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे.
मध्यमवर्गावर परिणाम
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालांनुसार, शहरी कुटुंबांचा मासिक खर्च ६५% वाढला आहे.
उत्पन्न वाढले तरी खर्च अधिक आहे. बचत कमी झाली. मध्यमवर्गावर या वाढीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.
२ ते ३ पट घरभाडे वाढले आहे.
१५ वर्षांत पेट्रोलचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत.
