Honda Vs TVS: भारतीय बाजारपेठेत सध्या विविध कंपन्यांच्या बाईक्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये होंडा आणि टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. जर तुम्ही १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये एक परवडणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर होंडा SP 125 आणि TVS Raider 125 हे दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत. मात्र, या दोन्हीपैकी कोणती बाईक खरेदी करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल, याची सविस्तर माहिती घेऊया.
किंमतीमधील फरक
सुरुवातीला या दोन्ही बाईक्सच्या किंमतीबद्दल बोलायचं झाले तर, होंडा SP 125 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८६,३७८ रुपये आहे. दिल्लीमध्ये सर्व करांसह या बाईकची ऑन-रोड किंमत सुमारे १ लाख रुपयांपर्यंत जाते. दुसरीकडे, TVS Raider 125 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८०,७५० रुपये इतकी असून, दिल्लीत या बाईकची ऑन-रोड किंमत साधारण ९५,६४२ रुपये पडते. किंमतीच्या बाबतीत टीव्हीएस रायडर ही होंडापेक्षा काहीशी स्वस्त आहे.
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
इंजिन आणि मायलेजची कामगिरी
इंजिन क्षमतेचा विचार केला तर होंडा SP 125 मध्ये १२४.१ सीसीचे एअर-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे, तर TVS Raider 125 मध्ये १२४.८ सीसीचे एअर-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन मिळतं. गिअरबॉक्सच्या बाबतीत टीव्हीएस रायडरमध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स मिळतो, तर होंडाच्या बाईकमध्ये ४-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजबाबत होंडा SP 125 आघाडीवर असून ती प्रति लिटर ६० ते ६५ किमीचं मायलेज मिळू शकतं, तर टीव्हीएस रायडरचे मायलेज ५५ ते ६० किमी प्रति लिटर इतकं असू शकतं.
काय आहेत फीचर्स?
फीचर्सच्या बाबतीत होंडाच्या तुलनेत टीव्हीएस रायडरमध्ये अधिक आधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळते. TVS Raider 125 मध्ये फुल डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स, युएसबी चार्जिंग पोर्ट आणि रायडिंग मोड्स यांसारख्या सुविधा मिळतात, ज्या होंडा SP 125 मध्ये उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त टीव्हीएसमध्ये मॉडर्न स्टाईलिंग पॅकेजही दिलं आहे. मात्र, जर तुम्हाला कमी देखभाल असलेली आणि दैनंदिन वापरासाठीबाईक हवी असेल, तर होंडा SP 125 हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
