Lokmat Money > बिझनेस न्यूज > HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

Stock Market Mayhem: एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:12 IST2025-01-06T13:11:27+5:302025-01-06T13:12:00+5:30

Stock Market Mayhem: एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

hmpv case fear leads tsunami in indian stock market sensex crashes 1200 points nifty slips below 24000 market | HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

Stock Market Crash On HMPC Fear : भारतीय शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी दुष्काळात तेरावा महिना, अशी परिस्थिती झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सतत चढउताराने हैराण झालेला गुंतवणूकदार आता आणखी एका गोष्टीने चिंतेत आहे. देशात नवीन विषाणू HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. सेन्सेक्स ११५० अंकांनी घसरुन ७८०६५ अंकांवर घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही ३६० अंकांनी घसरला आणि २४००० च्या खाली २३,६३३ अंकांवर घसरला. बँकिंग आणि ऊर्जा समभागांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही मोठी घसरण झाली. बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक इंडिया विक्स १३.३७ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

बाजाराला कोरोनाची आठवण
कर्नाटकातील बेंगळुरू येथे एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण असल्याची बातमी सकाळी समोर येताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. हा विषाणू सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला होता. एचएमपीव्ही प्रकरणानंतर बाजारातील गुंतवणूकदारांना ५ वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या कोरोना महामारीची आठवण झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे. बीएसई सेन्सेक्स १२०० अंकांच्या घसरणीसह २३,६१० अंकांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी ५० जवळपास ४०० अंकांनी १.६२ टक्क्यांनी घसरला आहे.

एचएमपीव्हीमुळे लाखो कोटींचे नुकसान
कर्नाटकात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईच्या बाजार भांडवलात ९ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मागील सत्रात ४४९.७८ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच बाजार भांडवलात ९.०४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सला सर्वाधिक फटका
बाजारातील मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. निफ्टीचा मिड-कॅप निर्देशांक ११०३ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे तर स्मॉल-कॅप निर्देशांक ४१३ अंकांनी खाली आला. याशिवाय बँकिंग शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत असून निफ्टी बँक १.६६ टक्क्यांनी घसरत आहे. एफएमसीजी, एनर्जी हेल्थकेअर, एफएससीजी आणि तेल आणि गॅस शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २७ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत, तर ४१३२ शेअर्सपैकी ३२६२ समभाग घसरणीसह आणि ७४३ वाढीसह व्यवहार करत आहेत.

Web Title: hmpv case fear leads tsunami in indian stock market sensex crashes 1200 points nifty slips below 24000 market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.