इंधन, अन्नधान्य, दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या वाढत असलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चावर ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण कमी येईल.
सर्वप्रथम, महिन्याचे बजेट तयार करा. उत्पन्नाच्या आधारावर ‘गरजेचे’ व ‘ऐच्छिक’ खर्च वेगळे करा. ५०-३०-२० नियम पाळून आर्थिक शिस्त राखा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणेही महत्त्वाचे आहे. ऑनलाइन खरेदी, बाहेरचे जेवण, सबस्क्रिप्शनवर मर्यादा आणल्यास बचत होते. ‘खरेदीपूर्वी दोनदा विचार’ हा साधा नियम उपयोगी ठरतो.
डोळे उघडे ठेवून खर्च करा -
इंधन खर्च कमी करण्यासाठी कार-पूलिंग, सार्वजनिक वाहतूक किंवा एकत्रित प्रवासाचे नियोजन करावे. तसेच, अन्नधान्याच्या किमती वाढत असताना घरी स्वयंपाकावर भर देणे, मोठ्या प्रमाणात खरेदी आणि स्थानिक बाजारपेठेचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे पैशात मोठी बचत होते.
तज्ज्ञांच्या मते, युद्धाच्या काळात आपत्कालीन निधी तयार ठेवणे आणि बचतीला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. महागाईचा सामना करण्यासाठी नियोजन, शिस्त आणि डोळे उघडे ठेवून खर्च केल्यास तुम्हाला महागाईचा फटका बसत नाही.
