Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता; 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितली गुंतवणुकीची खास रणनीती

सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता; 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितली गुंतवणुकीची खास रणनीती

Gold Silver Investment Robert Kiyosaki : सध्या सोन्या-चांदीच्या किमतीत अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खरेदी करावी की वाट पाहावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांत निर्माण झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:49 IST2026-02-09T11:47:41+5:302026-02-09T11:49:40+5:30

Gold Silver Investment Robert Kiyosaki : सध्या सोन्या-चांदीच्या किमतीत अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खरेदी करावी की वाट पाहावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांत निर्माण झालाय.

High volatility in gold and silver prices; Robert Kiyosaki, author of 'Rich Dad Poor Dad', shares special investment strategy | सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता; 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितली गुंतवणुकीची खास रणनीती

सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता; 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितली गुंतवणुकीची खास रणनीती

Gold Silver Investment Robert Kiyosaki : सध्या सोन्या-चांदीच्या किमतीत अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खरेदी करावी की वाट पाहावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांत निर्माण झालाय. भारतीय बाजारपेठेपेक्षा जागतिक बाजारपेठेत ही घसरण अधिक तीव्र आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सध्या नवीन गुंतवणूक नाही; 'बॉटम'ची प्रतीक्षा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की, "मी सध्या कोणतीही नवीन गुंतवणूक करत नाहीये, तर बाजारातील पुढच्या 'बॉटम'ची (किंमतींच्या नीचांकी पातळीची) वाट पाहत आहे." कियोसाकी यांच्या मते, जेव्हा चांदी ६० डॉलर, बिटकॉइन ६,००० डॉलर आणि सोनं ३०० डॉलरच्या आसपास होत, तेव्हाच त्यांनी खरेदी थांबवली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या बिटकॉइन आणि सोन्याच्या होल्डिंगपैकी काही भाग विकला देखील आहे.

घसरणीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Silver ११५००, तर Gold २६०० रुपयांपेक्षा अधिक महागलं

गुंतवणुकीचा मूळ मंत्र: खरेदी करतानाच होतो नफा

कियोसाकी म्हणतात की, त्यांना मालमत्ता विकणं आवडत नाही, कारण यामुळे 'कॅपिटल गेन टॅक्स'चा बोजा वाढतो. त्यांच्या मते, गुंतवणुकीचा मूळ सिद्धांत असा आहे की, नफा हा मालमत्ता विकताना नाही तर ती खरेदी करताना होतो. योग्य किमतीत मालमत्ता खरेदी करणे हीच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच ते सध्या संयम ठेवून योग्य संधीची वाट पाहत आहेत.

अति हाव ठरू शकते घातक

गुंतवणूकदारांना सतर्क करताना त्यांनी 'हाव' टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक उपरोधिक उदाहरण दिलं की, "डुक्कर जाड होतात, पण ते खूप जास्त जाड झाले की त्यांना कापलं जातं." ही टिप्पणी सध्याच्या तेजीच्या बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, जिथे अनेक गुंतवणूकदार जोखीम न समजता उच्च स्तरावर गुंतवणूक करत आहेत.

अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर चिंता

कियोसाकी यांनी अमेरिकेच्या वाढत्या कर्जावर पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली आहे. "अमेरिकेवर राष्ट्रीय कर्ज सुमारे ३८ ट्रिलियन डॉलर आहे. पण सामाजिक सुरक्षा आणि मेडिकेअर यांसारखी दायित्वे जोडली तर हे वास्तविक कर्ज २५० ट्रिलियन डॉलरच्या आसपास पोहोचतं," असं ते म्हणाले. हे कर्ज येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आर्थिक संकट असेल, असं त्यांचं मत आहे.

पुन्हा खरेदी कधी करणार?

रॉबर्ट कियोसाकी यांनी आपली पुढील रणनीती सांगताना स्पष्ट केलं की, जेव्हा चांदी ७४ डॉलर आणि सोनं ४,००० डॉलरच्या पातळीवर येईल, तेव्हा ते पुन्हा खरेदी करण्याचा विचार करू शकतात. 'एथेरियम' (Ethereum) या क्रिप्टोचलनाबद्दल बोलताना, सध्या आपल्याकडे त्याचं पुरेसं होल्डिंग असल्याचंही ते म्हणाले.

Web Title : सोने-चांदी में अस्थिरता: रॉबर्ट कियोसाकी की निवेश रणनीति

Web Summary : सोने-चांदी की कीमतों में अस्थिरता के बीच, रॉबर्ट कियोसाकी निवेश से पहले बाजार के निचले स्तर का इंतजार कर रहे हैं। वे दीर्घकालिक संपत्ति के लिए कम खरीदने पर जोर देते हैं और लालच के खिलाफ चेतावनी देते हैं। कियोसाकी अमेरिका के बढ़ते कर्ज पर भी चिंतित हैं और 4,000 डॉलर पर सोना और 74 डॉलर पर चांदी खरीदने की योजना बना रहे हैं।

Web Title : Gold-Silver Volatility: Robert Kiyosaki's Investment Strategy Amid Market Uncertainty

Web Summary : Amidst gold and silver price volatility, Robert Kiyosaki awaits market bottom before investing. He emphasizes buying low for long-term wealth, cautioning against greed. Kiyosaki also expresses concern over America's rising debt and plans to buy gold at $4,000 and silver at $74.