Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात वेगाने वाढतेय संपत्ती! करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचणार, सध्या किती? 

देशात वेगाने वाढतेय संपत्ती! करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचणार, सध्या किती? 

High net worth individuals india: नाइट फ्रैंकचा अहवाल; केवळ एका वर्षात श्रीमंत वाढले ६ टक्क्यांनी, २०२८ पर्यंत देशात करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचण्याचा अंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:48 IST2025-03-06T21:46:31+5:302025-03-06T21:48:22+5:30

High net worth individuals india: नाइट फ्रैंकचा अहवाल; केवळ एका वर्षात श्रीमंत वाढले ६ टक्क्यांनी, २०२८ पर्यंत देशात करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचण्याचा अंदाज आहे.

high net worth individuals increased in india | देशात वेगाने वाढतेय संपत्ती! करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचणार, सध्या किती? 

देशात वेगाने वाढतेय संपत्ती! करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचणार, सध्या किती? 

नवी दिल्ली : एक कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंत भारतीयांची (हाय नेटवर्थ वेल्थ इंडिविज्युअल्स) संख्या २०२४ मध्ये सहा टक्के वाढून ८५,६९८ वर पोहोचल्याचे जागतिक रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट फ्रैंकच्या अहवालातून समोर आले आहे. नाइट फ्रैंकने बुधवारी आपला 'द वेल्थ रिपोर्ट-२०२५' प्रसिद्ध केला. (high net worth individuals india News)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२०२३ मध्ये देशातील श्रीमंतांची संख्या ८०,६८६ इतकी होती. सल्लागार कंपनीने म्हटले आहे की, २०२८ पर्यंत देशातील श्रीमंतांची संख्या वाढून ९३,७५३ वर पोहोचण्याची शक्यता आहे. यावरून असे दिसून येते की भारतामध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या वाढत आहे.

करोडपतींची संख्या किती?

२०२३ मध्ये देशात करोडपतींची संख्या ८०,६८६ इतकी होती. ती २०२४ मध्ये ८५,६९८ पर्यंत पोहोचली असून, २०२८ पर्यंत ही संख्या ९३,७५३ पोहोचण्याचा अंदाज आहे. 

अब्जाधीशांकडे किती संपत्ती ?

नाइट फ्रैंकच्या अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये सध्या १९१ अब्जाधीश आहेत. यातील २६ जणांचा समावेश या यादीत मागच्या वर्षातच झाला आहे. २०१९ मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या केवळ ७ इतकी होती.

भारतातील सर्व अब्जाधीशांकडे असलेली एकत्रित संपत्ती ९५० अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिकेत अब्जाधीशांकडे ५,७०० अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

ही संख्या जगात सर्वाधिक आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनमधील अब्जाधीशांजवळ एकूण संपत्ती १,३४० अब्ज डॉलर इतकी आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Web Title: high net worth individuals increased in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा