Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?

'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?

HDFC Bank Services: आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज बँकेशी संबंधित काही काम करतो. यामध्ये UPI पेमेंटपासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:28 IST2025-08-16T12:28:38+5:302025-08-16T12:28:38+5:30

HDFC Bank Services: आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज बँकेशी संबंधित काही काम करतो. यामध्ये UPI पेमेंटपासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

HDFC s banking facilities will be closed for 7 hours on 22 august 2025 for maintenance See which services will not be available | 'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?

'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?

HDFC Bank Services: आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज बँकेशी संबंधित काही काम करतो. यामध्ये UPI पेमेंटपासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या बँकेची काही सेवा ७ तासांसाठी बंद असेल तर ती स्वतःच एक मोठी गोष्ट आहे आणि जर ही बँक देशातील पहिली सर्वात मोठी खाजगी बँक असेल, तर तिच्या ग्राहकांनी सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे. पुढील आठवड्यात HDFC बँकेच्या काही सेवा ७ तासांसाठी बंद राहतील, अशा परिस्थितीत, HDFC बँकेच्या ग्राहकांना समस्या टाळण्यासाठी त्यांची बँकेशी संबंधित सर्व कामं थोडी आधी पूर्ण करावी लागणारेत. HDFC बँकेच्या कोणत्या सेवा कधी आणि कोणत्या वेळी बंद राहील ते जाणून घेऊ.

सेवा कधी बंद राहणार?

एचडीएफसी बँकेने शुक्रवारी जाहीर केलं की या महिन्याच्या अखेरीस काही ग्राहक सेवा चॅनेलवर परिणाम करणारे नियोजित सिस्टम मेंटेनन्स केला जाईल. ही देखभाल २२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:०० ते २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण ७ तास चालेल.

"आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?

कोणत्या सेवा बंद राहतील?

या काळात, फोन बँकिंग आयव्हीआर, ईमेल सपोर्ट, सोशल मीडिया चॅनेल, व्हॉट्सअॅपवर चॅट बँकिंग आणि एसएमएस बँकिंग यासारख्या ग्राहक सेवा सेवा उपलब्ध राहणार नाहीत. दरम्यान, खातं किंवा कार्ड हरवल्यास/फसवणूक झाल्यास हॉटलिस्टिंगसाठी दिलेल्या टोल-फ्री क्रमांकावर सेवा उपलब्ध राहतील. ग्राहक या काळात फोन बँकिंग एजंट सेवा आणि नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, पेझॅप आणि मायकार्ड्स सारख्या डिजिटल चॅनेलद्वारे त्यांचे व्यवहार सुरू ठेवू शकतात. ही देखभाल, प्रणालीची क्षमता वाढवण्यासाठी आणि चांगला बँकिंग अनुभव देण्यासाठी केली जात असल्याचं बँकेनं म्हटलंय.

Web Title: HDFC s banking facilities will be closed for 7 hours on 22 august 2025 for maintenance See which services will not be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.