lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC Bank समूह इंडसइंड,येस बँकेसह या ६ बँकांमधील ९.५ टक्के हिस्सा खरेदी करणार; आरबीआयने मंजूरी दिली

HDFC Bank समूह इंडसइंड,येस बँकेसह या ६ बँकांमधील ९.५ टक्के हिस्सा खरेदी करणार; आरबीआयने मंजूरी दिली

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँक समूहाला इंडसइंड बँक आणि येस बँकेसह ६ बँकांमधील ९.५ टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 03:41 PM2024-02-06T15:41:42+5:302024-02-06T15:42:52+5:30

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँक समूहाला इंडसइंड बँक आणि येस बँकेसह ६ बँकांमधील ९.५ टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

HDFC Bank Group will buy 9.5 percent stake in these 6 banks including IndusInd, Yes Bank; RBI approved | HDFC Bank समूह इंडसइंड,येस बँकेसह या ६ बँकांमधील ९.५ टक्के हिस्सा खरेदी करणार; आरबीआयने मंजूरी दिली

HDFC Bank समूह इंडसइंड,येस बँकेसह या ६ बँकांमधील ९.५ टक्के हिस्सा खरेदी करणार; आरबीआयने मंजूरी दिली

रिझर्व्ह बँकेने HDFC बँक समूहाला IndusInd बँक, येस बँक, ICICI बँक, Axis बँक, बंधन बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेतील ९.५० टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. समूहाने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँक समूहाची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि एचडीएफसी एर्गो या सर्व बँकांमधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने या समूहाला फक्त एक वर्षाचा कालावधी दिला आहे. जर समूह या कालावधीत हे सौदे पूर्ण करू शकला नाही, तर ही मान्यता रद्द केली जाईल. यासोबतच मध्यवर्ती बँकेने एचडीएफसीसमोर एक अटही ठेवली आहे. इंडसइंड बँकेतील एचडीएफसी समूहाची हिस्सेदारी ९.५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. यासोबतच, जर इंडसइंड आणि येस बँकेतील समूहाची एकूण हिस्सेदारी ५ टक्के किंवा त्याहून कमी असेल आणि त्यानंतर एचडीएफसी बँक समूहाला त्यांची हिस्सेदारी ९.५ टक्क्यांपर्यंत नेण्याची इच्छा असेल, तर अशा परिस्थितीत त्यांना आरबीआयची परवानगी घ्यावी लागेल. याची पुन्हा मंजुरी घ्यावी लागेल, अशी यात अट घातली आहे.

टाटाच्या या कंपनीनं रचला इतिहास, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹4300 पार जाऊ शकतो शेअर! 

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँक समूहाला बँकिंग कायदा, १९४९ अन्वये या सर्व बँकांमधील हिस्सा वाढवण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये फेमासोबतच सेबी आणि इतर नियमही लागू होतील.

एका अहवालानुसार, प्रमोटर IndusInd International Holding Limited आणि IndusInd Limited यांची बँकेत एकूण १६.४५ टक्के हिस्सेदारी आहे. डिसेंबर २०२३ च्या आकडेवारीनुसार, बँकेचा १५.६३ टक्के हिस्सा म्युच्युअल फंडांकडे आहे. तर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा बँकेत ७.०४ टक्के हिस्सा आहे. तर विदेशी गुंतवणूकदारांचा बँकेचा हिस्सा ३८.२४ टक्के आहे.

यासह येस बँकेचा १०० टक्के हिस्सा जनतेकडे आहे. यामध्ये SBI कन्सोर्टियमचा ३७.२३ टक्के हिस्सा आहे. तर LIC ची ४.३४ टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेची ३.४३ टक्के आणि ॲक्सिस बँकेची २.५७ टक्के हिस्सेदारी आहे.

Web Title: HDFC Bank Group will buy 9.5 percent stake in these 6 banks including IndusInd, Yes Bank; RBI approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.