Record Breaking Increment: एचसीएल टेकचे सीईओ भारताच्या आयटी क्षेत्रातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक बनले आहेत. सी विजयकुमार यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात १०.८५ मिलियन डॉलर (सुमारे ९४.६ कोटी रुपये) कमावले. त्यांचं मानधन टीसीएस आणि इन्फोसिस या बड्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या प्रमुखांपेक्षा जास्त होतं. पीटीआयच्या वृत्तानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं पुढील आर्थिक वर्षासाठी (आर्थिक वर्ष २०२६) त्यांच्या वेतनात ७१% ची मोठी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर त्यांचं वेतन आता १८.६ मिलियन डॉलर्स (सुमारे १५४ कोटी रुपये) असेल.
कसा बनला रेकॉर्ड?
- बेसिक सॅलरी : १.९६ मिलियन डॉलर (जवळपास १७.१ कोटी रुपये)
- परफॉर्मन्स बोनस : १.७३ मिलियन डॉलर (अंदाजे १५.१ कोटी रुपये)
- आरएसयू : ६.९६ मिलियन डॉलर (अंदाजे ६०.७ कोटी रुपये), जे एकूण उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा आहे.
- इतर फायदे : ०.२० मिलियन डॉलर (सुमारे १.७ कोटी रुपये)
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ही रचना अधिक आकर्षक असेल, जिथे फिक्स्ड आणि परफॉर्मन्स-लिंक्ड दोन्ही घटक वाढविण्यात आले आहेत.
NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
विजयकुमार कितपत पुढे?
विजयकुमार यांचा पगार इतर आयटी दिग्गजांपेक्षा खूप जास्त आहे, जसे की...
- टीसीएसचे के कृतिवासन : २६.५२ कोटी रुपये
- इन्फोसिसचे सलील पारेख: ८०.६२ कोटी रुपये
- विप्रोचे श्रीनिवास पल्लिया: ५३.६४ कोटी रुपये
- टेक महिंद्राचे मोहित जोशी: ५३.९ कोटी रुपये
या तुलनेवरून स्पष्ट होते की विजयकुमार हे भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत.
कंपनीला कसा फायदा झाला?
ईटी नाऊच्या मते, विजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली, एचसीएल टेकचे मार्केट कॅप मार्च २०१६ मध्ये ₹१.१५ लाख कोटींवरून मार्च २०२५ पर्यंत ₹४.३२ लाख कोटींपर्यंत वाढलं, जे ३.८ पट वाढ दर्शवतं. याच कालावधीत इतर टॉप आयटी कंपन्यांचे मार्केट कॅप सरासरी फक्त २.५ पट वाढलं. कंपनीनं या कामगिरीचे वर्णन त्यांच्या "योगदान आणि दीर्घकालीन नेतृत्वाचे" परिणाम म्हणून केलं आहे.