HCL-TCS Salary Hike: देशातील दोन सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांनी अखेर त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. दिवाळीच्या अगदी आधी ही घोषणा करून त्यांनी उत्सवादरम्यान कर्मचाऱ्यांच्या उत्साहात भर घातली. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टीसीएस आणि एचसीएलटेक यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह व्हेरिएबल पे देण्याची घोषणा केली आहे. तिमाहीत व्हेरिएबल पे देण्याऐवजी, एचसीएलनं आता त्यांची मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतलाय, जो ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल.
एचसीएलचे मुख्य लोक अधिकारी राम सुंदरराजन यांनी सांगितलं की, सप्टेंबर तिमाहीसाठी व्हेरिएबल पे ऑक्टोबरमध्ये दिला जाईल. ते पुढे म्हणाले, "सप्टेंबर तिमाहीचे निकाल आमच्यासाठी चांगले राहिले आहेत आणि आता आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही गेल्या वर्षीप्रमाणेच प्रक्रिया अवलंबू." गेल्या वर्षी, एचसीएलनं ७% वाढीसह सुरुवात केली आणि उच्च कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ ते १४% वाढ मिळाली होती.
पगारात व्हेरिएबल्स जोडले जाणार
"आम्ही पगार वाढीसह व्हेरिएबल्स पेचे नियम बदलले आहेत. आतापर्यंत ते तिमाही आधारावर दिले जात होते, परंतु आता ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे आणि पगारातच जोडली जाईल. काही कर्मचाऱ्यांच्या व्हेरिएबल्स पेबद्दल तक्रारी असल्यानं कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे," अशी माहिती एचसीएल टेकच्या एचआर प्रमुखांनी दिली. एचसीएलनं दुसऱ्या तिमाहीत ३,४८९ कर्मचाऱ्यांनाही कामावर ठेवलं, ज्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २,२६,६४० झाली. दुसऱ्या तिमाहीत कंपनीन ५,१९६ फ्रेशर्सचीही भरती केली.
दुसऱ्या तिमाहीत किती कमाई
एचसीएलटेकने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल ११% वाढून ₹३१,९४२ कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ₹२८,८६२ कोटी होता. तिमाही आधारावर, महसूल ५.२% वाढला, तर निव्वळ नफ्यात १०.१७% वाढ झाली. गेल्या काही वर्षांत कंपनीने सातत्याने ३% ते ५% वार्षिक वाढ साध्य केली आहे, तर ऑपरेटिंग मार्जिन १७% ते १८% पर्यंत वाढले आहे.
दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न
एचसीएलटेकचा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल ११% वाढून ₹३१,९४२ कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ₹२८,८६२ कोटी होता. तिमाही आधारावर, महसूल ५.२% वाढला, तर निव्वळ नफ्यात १०.१७% वाढ झाली. गेल्या काही वर्षांत कंपनीनं सातत्यानं ३% ते ५% वार्षिक वाढ साध्य केली आहे, तर ऑपरेटिंग मार्जिन १७% ते १८% पर्यंत वाढलं आहे.