HDFC Loan Interest Rates Reduce: जर तुम्ही आगामी काळात कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच तुमच्या कोणत्याही कर्जाचा ईएमआय भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीबँकेनं आपल्या कर्जाचे दर कमी केले आहेत. अशा परिस्थितीत कर्ज घेणाऱ्यांना किंवा यापूर्वीपासून कर्ज सुरू असलेल्या लोकांना याचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया अधिक माहिती.
एचडीएफसी बँक कर्जाचे दर
एचडीएफसी बँकेनं आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये ३० बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. अशा परिस्थितीत कर्जाच्या व्याजदरात ०.३० टक्के कपात करण्यात आलीये. ही वजावट सर्व प्रकारच्या गृहकर्ज, कार लोन आणि इतर प्रकारच्या कर्जांना लागू आहे. एचडीएफसी बँकेचे नवे व्याजदर ७ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. नव्या व्याजदराचा लाभ केवळ त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे कर्ज रेपो रेटशी जोडलेले आहे, म्हणजेच ज्यांनी फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलं आहे.
जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा, अदानींनी त्यानंच बनवला रस्ता; पाहा डिटेल्स
एचडीएफसी बँक एमसीएलआर
एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर पूर्वी १ वर्षासाठी ९.०५ टक्के होता, तो आता ८.७५ टक्क्यांवर आला आहे. ६ महिन्यांसाठी एमसीएलआर ८.७५ टक्के आणि ३ महिन्यांसाठी एमसीएलआर ८.७५ टक्के आहे. तसंच १ महिन्यासाठी एमसीएलआर ८.६० टक्के आहे, जो पूर्वी ८.९० टक्के होता.
एमसीएलआर म्हणजे काय?
एमसीएलआर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट, हा व्याजदर आहे ज्यावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयच्या रेपो दरानुसार ही मर्यादा निश्चित केली जाते.