Happy Birthday Google: आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी Google आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं Google ने एक खास डूडल बनवलं आहे, ज्यात त्याचा सर्वात पहिला लोगो दाखवण्यात आला आहे. हे डूडल जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांना धन्यवाद देतं जे Google च्या प्रवासाचा भाग बनलेत. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटी Google आपल्या स्थापनेचा उत्सव साजरा करते. हे डूडल Google च्या सर्च होमपेजवर दिसत आहे आणि १९९८ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची आठवण करून देते.
Google चा अर्थ काय आहे?
Google चे नाव अधिकृतपणे कोणतेही संक्षिप्त रूप (acronym) नाही, परंतु लोक ते अनेकदा “Global Organization of Oriented Group Language of Earth” म्हणून समजतात.
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
Google कुठून आलं?
Google चं नाव “गूगोल” (Googol) वरून आले आहे, जी एक अशी संख्या आहे ज्यात १ नंतर १०० शून्य असतात. हे नाव यासाठी निवडलं गेलं कारण Google चा उद्देश इंटरनेटवरील खूप सारी माहिती व्यवस्थित करणं हा होता. आज Google फक्त सर्च इंजिन नाही, तर ते जीमेल, Google Maps, YouTube, Google Cloud, Android, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स आणि Pixel फोनसारख्या हार्डवेअरपर्यंत पसरलं आहे.
Google ची सुरुवात कधी झाली?
Google ची सुरुवात १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी केली होती. त्यावेळी दोघेही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचे विद्यार्थी होते. Google ची अधिकृत स्थापना ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली होती, परंतु २००० च्या दशकापासून Google २७ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. ही तारीख यासाठी निवडली गेली कारण या दिवशी Google नं इंटरनेटवर विक्रमी संख्येनं पेजेस इंडेक्स केले होते, जो एक महत्त्वाचा टप्पा होता.
आज Google ची मालकी अल्फाबेट इंक. (Alphabet Inc.) कडे आहे. २०१५ मध्ये अल्फाबेट नावाची एक होल्डिंग कंपनी तयार करण्यात आली होती, ज्या अंतर्गत Google च्या मुख्य सेवा आणि काही नवीन प्रयोग जसे वेमो (सेल्फ-ड्राइव्हिंग कार), वेरिली (हेल्थ टेक्नॉलॉजी) आणि एक्स रिसर्च चालवले जातात. अल्फाबेट एक पब्लिक कंपनी आहे.
यामध्ये मोठे गुंतवणूकदार, सामान्य लोक आणि कंपनीतील लोक यांचा समावेश आहे. परंतु लॅरी पेज, सर्जी ब्रिन आणि काही खास लोकांकडे क्लास बी शेअर्स आहेत, ज्यांच्याद्वारे त्यांना जास्त मतदान शक्ती मिळते. म्हणजे कंपनीच्या मोठ्या निर्णयांमध्ये त्यांच्या मताला जास्त वजन असते.
लॅरी पेज, सर्जी ब्रिन दैनंदिन कामांपासून दूर
लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन आता Google च्या दैनंदिन कामांपासून दूर आहेत, परंतु ते अल्फाबेटचे बोर्ड मेंबर्स आहेत. Google आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आहेत. ते कंपनीला नवीन दिशा देत आहेत, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कंप्युटिंग आणि हार्डवेअर सारख्या क्षेत्रांमध्ये ते कंपनीला एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जात आहेत. सुंदर पिचाई भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली Google नं अनेक नवीन तंत्रज्ञानावर काम केले आहे.
Google आज जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. हे केवळ माहिती शोधण्याचे साधन नाही, तर आपल्या जीवनाचा एक भाग बनलं आहे. मग ते मॅप्सने रस्ता शोधणं असो, YouTube वर व्हिडीओ पाहणं असो किंवा अँड्रॉइड फोन वापरणे असो, Google सर्वत्र आहे.