Lokmat Money > बिझनेस न्यूज > GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले

GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले

GST Reforms : सोमवारपासून नवीन जीएसटी दर लागू झाले. सरकारचे म्हणणे आहे की सुमारे ४०० वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. पण, काही अन्नपदार्थांना अजूनही सवलत मिळत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:09 IST2025-09-24T11:07:45+5:302025-09-24T11:09:06+5:30

GST Reforms : सोमवारपासून नवीन जीएसटी दर लागू झाले. सरकारचे म्हणणे आहे की सुमारे ४०० वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. पण, काही अन्नपदार्थांना अजूनही सवलत मिळत नाही.

GST Rate Cut Are Companies Cheating Consumers by Increasing Product Weight? | GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले

GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले

GST Reforms : जीएसटी कपातीचे नवीन दर लागू झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. लोक स्वस्त खरेदीचा लाभ घेताना दिसत आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू झाले असले तरी काही खाद्यपदार्थांवर ग्राहकांना कोणताही फायदा मिळत नसल्याचे चित्र आहे. काही कंपन्यांनी पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या किमती कमी करण्याऐवजी त्यांचे वजन वाढवले ​​आहे, ज्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिक दोघेही चिंतेत आहेत.

नवीन जीएसटी सुधारणांनंतर, सरकारने ५% आणि १८% या दोनच स्लॅबमध्ये बहुतांश वस्तू आणल्या आहेत. त्यामुळे, पूर्वी १२% जीएसटी असलेल्या अनेक वस्तू आता ५% स्लॅबमध्ये आल्या आहेत. व्यावसायिक हेमंत यांनी सांगितले की, तूप, ज्यूस, सॉस, नमकीन अशा पॅकेज्ड फूडवर पूर्वी १२% जीएसटी होता, तो आता ५% झाला आहे. मात्र, जुन्या स्टॉकच्या वस्तू जुन्या एमआरपीवरच विकल्या जात आहेत.

कंपन्यांची चलाखी
याचा फायदा ग्राहकांना मिळत नाहीये. हेमंत यांनी सांगितले की, कंपन्या एक वेगळीच खेळी खेळत आहेत. ग्राहकांना दर कमी करण्याऐवजी उत्पादनाचे वजन वाढवून 'बनवले' जात आहे. उदाहरणार्थ, काही काळापूर्वी २० रुपयांच्या एका केकचे वजन ४४ ग्रॅम होते, पण आता कंपनीने त्याची किंमत कमी करण्याऐवजी वजन ५० ग्रॅम केले आहे. यामुळे, नवीन दरांचा थेट फायदा लोकांना मिळत नाहीये.

वाचा - घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम

सायकल स्वस्त झाली, पण खेळणी महागणार
एक सकारात्मक बातमी म्हणजे सायकलच्या दरात ७% ची घट झाली आहे. आता नव्या दरांवर सायकलची विक्री होत आहे. मात्र, दुसरीकडे खेळण्यांच्या व्यवसायात नाराजीचे वातावरण आहे. राजीव या खेळणी व्यावसायिकाने सांगितले की, ज्या खेळण्याला म्युझिक हॉर्न जोडलेला आहे, त्यावर आता १२% ऐवजी १८% जीएसटी लागू झाला आहे. यामुळे अशी खेळणी अधिक महाग होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा विरोध म्हणून खेळणी संघटनांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे.

Web Title: GST Rate Cut Are Companies Cheating Consumers by Increasing Product Weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.